टॉप स्टोरी

प्रशांत किशोर- शरद पवार यांची पुन्हा दिल्लीत भेट, भाजपविरोधात मोट बांधण्याची रणनिती?

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांची आज पुन्हा नवी दिल्लीत भेट झाली. गेल्या दहा दिवसांतील दोघांची ही दुसरी भेट आहे. यापूर्वी प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी शरद पवारांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली होती. आता पुन्हा एकदा दोघांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीची तयारी म्हणून या...

देश

सीरमची कोविशिल्ड लस केंद्र सरकारला २०० रुपयांत, किरकोळ किंमत मात्र १००० रुपये!

मुंबईः डीसीजीआयने भारतात सीरमच्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिल्यानंतर आता सीरमचे सीईओ अदर पुनावाला यांनी कोविशिल्ड लसीची किंमत जाहीर केली आहे. केंद्र सरकारला कोविशिल्ड लसीचा एक डोस २०० रुपयांत मिळणार आहे. मात्र किरकोळ बाजारात या लसीच्या एका डोजची किंमत १००० रुपये असणार...

Breaking: औरंगाबादेत ८५ व्यापारी पॉझिटिव्ह, एका व्यापाऱ्याच्या कुटुंबातील १४ सदस्य बाधित

औरंगाबादः औरंगाबादेतील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना अँटिजेन टेस्ट करण्यात आली असून आजपर्यंत करण्यात आलेल्या टेस्टमध्ये व्यापारी व दुकानदारांपैकी ८५ व्यापारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून धक्कादायक बाब म्हणजे एका व्यापाऱ्याच्या कुटुंबातील १४ सदस्यही पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना साखळी खंडित...

घराची स्वप्नपूर्तीः ग्रामीण महाआवास अभियानाला ५ जूनपर्यंत मुदतवाढ!

मुंबई: राज्यातील प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व सर्व राज्य पुरस्कृत आवास योजनांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी व त्यामध्ये गुणवत्ता आणण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या महाआवास अभियानाला (ग्रामीण) ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. राज्यातील पात्र लाभार्थ्यांना पावसाळ्यापूर्वी गृहप्रवेश करता यावा तसेच घरकुलासोबतच...

संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू, आंतरजिल्हा सीमाही सीलः मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबईः महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संचारबंदी लागू केल्याची घोषणा केली.  कोरोना विषाणुचा संसर्ग सध्या टर्निंग पॉइंटवर आहे.  तो धोकादायक टप्प्यावर आहे. त्यामुळे हा संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी संचारबंदी जाहीर करत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्यामुळे आता कुणालाही...

निश्चिंत रहा, अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई मिळणारः मुख्यमंत्र्यांची शेतकऱ्यांना ग्वाही

मुंबईः राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून शासन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार आहे. निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना आपण मदत केली आहे. विदर्भात अतिवृष्टीने जे नुकसान झाले त्यांना मदत करण्यासाठी निधी मंजूर केला आहे. आता सतत पडणाऱ्या पावसानेही पिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी चिंता न करता...

निलेश राणे- रोहित पवारांतील ‘कुक्कुटपालन’ वाद: वाचा कोंबडी चोरीचे रंजक किस्से…

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी माजी खासदार निलेश राणे यांनी शरद पवारांच्या मागणीवर केलेल्या टिकेला उत्तर देताना ‘कुक्कुटपालन...

एक कोटीहून अधिक लोकांना मिळाला आजवर ‘शिवभोजन’ थाळीचा आधार!

मुंबई: गोर-गरीब आणि गरजू लोकांना सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध व्हावे यासाठी प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून राज्यात ‘शिवभोजन’ योजना सुरू असून २६ जानेवारीपासून आजपर्यंत...

ओबीसी नेत्याचा काटा ओबीसी नेत्याच्याच हातानेः संजय राठोड प्रकरणात भाजपची नवी खेळी!

मुंबईः पूजा चव्हाण प्रकरणाशी नाव जोडल्या गेल्यामुळे अडचणीत आलेले विदर्भातील दिग्रसचे शिवसेना आमदार आणि वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या शक्यतांचा नुसताच बाजार...

मराठा आरक्षण रद्द, सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल; ५० टक्के आरक्षण मर्यादेवर शिक्कामोर्तब

नवी दिल्लीः महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाने आज महत्वाचा निकाल दिला. मराठा आरक्षणाचा कायदा रद्द करण्यात...

महाराष्ट्र

२३ नोव्हेंबरपासून उघडणार इयत्ता नववी ते १२ वीच्या शाळा?

मुंबईः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा उघडण्याबाबत दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असे संकते महाविकास आघाडी सरकारने आधीच दिले होते. आता दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून राज्यातील इयत्ता नववी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्याचा हालचाली सुरु असून तशी विनंती शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असून याबाबत लवकरच...

कर्नाटकव्याप्त सीमा प्रदेशातील मराठी शाळांचा प्रश्न मार्गी लावणार

मुंबई: महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा टिकवण्यासाठी तसेच तेथील सांस्कृतिक संस्था, ग्रंथालय व नाट्यचळवळ वाढविण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करेल, अशी ग्वाही मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील मराठी शाळा, सांस्कृतिक संस्था, ग्रंथालय व नाट्यगृहांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी आयोजित...

राज्यात मोठे समारंभ न घेण्याचा निर्णय, अनेक ठिकाणी शिवजयंती मिरवणुकीला परवानगी नाही

मुंबईः पुण्यानंतर महानगरी मुंबईतही कोरोनाची बाधा झालेले दोन रूग्ण आढळल्यामुळे खरबदारीचा उपाय म्हणून राज्यात कोणतेही मोठे समारंभ न घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. राज्यात कोरोनाचा होत असलेला कोरोनाचा फैलाव लक्षात घेता उद्या गुरूवारी तिथीनुसार साजरी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त अनेक शहरांत...

महादेवाच्या पिंडीवर २५ वर्षीय युवकाने स्वतःचाच गळा चिरला? पैठणमधील घटनेने खळबळ

पैठणः औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण तालुक्यातील जुने कावसन येथील तिहेरी हत्याकांड प्रकरण ताजे असताना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पुन्हा एका पंचवीस वर्षीय युवकाचा तीक्ष्ण हत्याराने गळा चिरलेला मृतदेह आढळून आला. शहरातील गंगवेश्वर महादेव मंदिरात कटरने त्याच युवकाने गळा चिरल्याने महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा सडा पडला होता. त्यामुळे हा...

भीमा कोरेगाव शौर्यदिनी विजयस्तंभाजवळ गर्दी, जाहीर सभा, पुस्तकांचे स्टॉल लावण्यास बंदी

पुणेः कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तभांवर होणाऱ्या अभिवादन कार्यक्रमासाठी राज्याच्या गृह विभागाने गाइडलाइन्स जारी केल्या असून नागरिकांना गर्दी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. या परिसरात जाहीर सभा घेण्यास आणि खाद्यपदार्थ, पुस्तकांचे स्टॉल लावण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. भीमा...

भूतदयेची राजकीय नौटंकी!

भाजपच्या भूतदयेच्या राजकीय नौटंकीचे एक मोठे उदाहरण भाजपशासित राज्य हिमाचल प्रदेश आहे. या राज्यात उत्पात मजवणार्‍या दोन लाख माकडांचा धोका १० जिल्ह्यातील...

ग्रामपंचायत निकालः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या मूळ गावातच फडकला शिवसेनेचा भगवा

कोल्हापूरः भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना ग्रामपंचायत निवडणुकीत जोरदार धक्का बसला आहे. त्यांचे मूळ गाव असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेने भगवा...

ना सरकारची स्थापना, ना मुख्यमंत्र्यांचा शपथविधी : विधानसभेत आमदारांना प्रथमच अशा स्थितीत शपथ

मुंबई: महाराष्ट्राच्या 14 व्या विधानसभेतील निर्वाचित सदस्यांना आज विशेष अधिवेशनात हंगामी विधानसभा अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी शपथ दिली. यावेळचा आमदारांचा शपथविधी महाराष्ट्र विधानसभेच्या कित्येक...

साय-टेक

‘टिकटॉक प्रो’फेक लिंकपासून सावध रहा!

मुंबईः टीकटॉकवर बंदी घातली असली तरीसुद्धा आज ही या ॲपचे अनेक वापरकर्ते व चाहते इंटरनेटवर आहेत. याचा फायदा घेण्यासाठी सायबर गुन्हेगार व...

लाइफस्टाइल

सांध्यांची काळजी घेण्याचे ५ उत्तम मार्ग

दिवसभर उत्साही राहाण्यासाठी केवळ स्ट्रेचिंग पुरेसे नाही. त्यासाठी विविध प्रकारचे व्यायाम, चांगले पोश्चर आणि तुमच्या आहारातील बदलही तितकेच आवश्यक आहेत... निरोगी वजन ठेवा :

अभिव्यक्ती

बढिया, सौ टका ‘ओरिजनल’ काम!

अर्थमंत्री व प्रधानमंत्री यांनी कोरोनाच्या निमित्ताने केलेल्या निवेदनांत अनेक बाबी सत्यपणे मांडल्या. आतापर्यंतची फुगीर आणि बडेजाव करणारी माहिती देण्याच्या फंदात कुणी पडलेले...

विशेष बातमी

राज्यातील कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग दोन दिवसांवरून सहा दिवसांवरः आरोग्य मंत्री टोपे

मुंबई : राज्यात कंटेनमेंट कृती आराखड्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याने कोरोना रुग्णांच्या दुपटीच्या दराचा वेग हा दोन दिवसांवरून सहा दिवसांवर गेला आहे. हा कालावधी जेवढा वाढेल ती राज्याच्या दृष्टीने समाधानाची बाब असेल, असा विश्वास व्यक्त करतानाच राज्यात अजून सहा ठिकाणी कोरोना चाचणीची सुविधा निर्माण होणार असल्याने राज्यातील प्रयोगशाळांची संख्या ३६ होईल, असे...

कांजूर मार्ग मेट्रो कारशेडच्या कामाला उच्च न्यायालयाची स्थगिती

मुंबईः कांजूर मार्ग मेट्रो कारशेडचे काम तत्काळ थांबवण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. कांजूर मार्ग मेट्रो कारशेडचे आतापर्यंत झालेले काम जैसे थे ठेवा, असेही उच्च न्यायालयाने एमएमआरडीएला आदेशित केले आहे. कांजूर मार्ग येथील जागा आपल्या मालकीची असल्याचा दावा करत केंद्र सरकारने जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तांतरण...

औरंगाबादेत आज ७४४ नवे रूग्ण, २४ रूग्णांचा मृत्यू

औरंगाबादः औरंगाबाद जिल्ह्यात आज दिवसभरात ७४४ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले तर २४ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ८ हजार ६३७ सक्रीय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांत औरंगाबाद जिल्ह्यात नव्याने आढळून येणारे कोरोनाबाधित रुग्ण आणि सक्रीय रुग्ण यांची संख्या आता निम्म्यावर आली आहे.

दिवाळी पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्व धार्मिकस्थळांचे दरवाजे उघडणार, मास्क अनिवार्य

मुंबईः कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याचे पाहून टाळेबंदीमुळे गेल्या सात महिन्यांहून अधिक काळ कुलूपबंद असलेली राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे पाडव्यापासून उघडण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी या निर्णयाची घोषणा करतानाच मंदिरे खुली करण्याचा हा फक्त सरकारी आदेश नसून 'श्रीं' ची इच्छा आहे असे...

२३ नोव्हेंबरपासून उघडणार इयत्ता नववी ते १२ वीच्या शाळा?

मुंबईः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा उघडण्याबाबत दिवाळीनंतर निर्णय घेतला जाईल, असे संकते महाविकास आघाडी सरकारने आधीच दिले होते. आता दिवाळीनंतर २३ नोव्हेंबरपासून राज्यातील इयत्ता नववी ते १२ वीच्या शाळा सुरु करण्याचा हालचाली सुरु असून तशी विनंती शालेय शिक्षण विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली असून याबाबत लवकरच...
1,528चाहतेआवड दर्शवा
74अनुयायीअनुकरण करा
256सदस्य यादीसदस्य व्हा