महाराष्ट्र

तीन सहसंचालक बदलले तरी ‘चिश्तिया’तील बोगस प्राध्यापकांची सुनावणी गुलदस्त्यातच, आता वेतन थकबाकी देण्याच्या हालचाली!
महाराष्ट्र, विशेष

तीन सहसंचालक बदलले तरी ‘चिश्तिया’तील बोगस प्राध्यापकांची सुनावणी गुलदस्त्यातच, आता वेतन थकबाकी देण्याच्या हालचाली!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): उर्दू एज्युकेशन सोसायटी संचलित खुलताबाद येथील चिश्तिया महाविद्यालयातील बोगस प्राध्यापक नियुक्त्या प्रकरणात  गेल्या तीन वर्षांत छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय कार्यालयात तीन सहसंचालक बदलले तरी उच्च शिक्षण संचालनालय अद्याप कोणत्याही ठोस निष्कर्षाप्रत पोहोचू शकले नाही. या प्रकरणात दोन सहसंचालकांनी घेतलेल्या सुनावणींचे निष्कर्ष गुलदस्त्यातच असताना या महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या वेतनाची आठ महिन्यांची थकबाकी अदा करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. खुलताबाद येथील चिश्तिया महाविद्यालयात अनेकांनी पात्रता नसतानाही प्राध्यापकांच्या नोकऱ्या मिळवल्या आहेत. मुलाखतीच्या तारखेपर्यंत विहित अर्हता नसतानाही अनेकांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यापैकी अनेक प्राध्यापकांकडे ते प्राध्यापकपदासाठी असलेली विहित अर्हता धारण करत असल्याचे पुरावेच नाहीत. काही विषयांत तर का...
‘प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते’ म्हणत सख्ख्या भावानेच सोडली अजित पवारांची साथ, म्हणालेः याच्यासारखा नालायक…
महाराष्ट्र, राजकारण

‘प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते’ म्हणत सख्ख्या भावानेच सोडली अजित पवारांची साथ, म्हणालेः याच्यासारखा नालायक…

बारामतीः ‘आपण औषध विकत घेतो त्याला एक्स्पायरी डेट असते. तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सख्खे मोठेबंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून भाजप-एकनाथ शिंदेंच्या शिवसेना सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले. या फुटीमुळे लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा नंणद-भावजयीचा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत. अशातच अजित पवारांचे सख्खे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनीच काकांनी काहीही दिले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. आत्तापर्यंत अजि...
अकोला, नांदेड, संभाजीनगर, हिंगोली आणि अमरावतीची जागा ‘वंचित’ला? महाविकास आघाडीचा संभाव्य जागावाटप फॉर्म्युला
महाराष्ट्र, राजकारण

अकोला, नांदेड, संभाजीनगर, हिंगोली आणि अमरावतीची जागा ‘वंचित’ला? महाविकास आघाडीचा संभाव्य जागावाटप फॉर्म्युला

मुंबईः लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. परंतु आघाडीची जागावाटपाची बोलणी पूर्ण झाली असून उद्धव ठाकरेंची शिवसेना २२, काँग्रेस १६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागा लढणार असल्याचा संभाव्य फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. आघाडीच्या या जागावाटपात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला चार ते पाच जागा सोडण्याचेही निश्चित झाले असून त्यात अकोला, नांदेड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), हिंगोली आणि अमरावतीचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपने महाराष्ट्रातील २० जागांची यादी जाहीर करून टाकली आहे. महायुतीचे जागावाटप निश्चित होण्याआधीच ही यादी जाहीर केल्यामुळे भाजपवर टिकाही करण्यात आली. महायुतीतील २८ जागांच्या वाटपावर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महा...
मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी, तृतीयपंथीयासह सात ते आठ जणांवर गुन्हा
महाराष्ट्र

मिलिंद महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी, तृतीयपंथीयासह सात ते आठ जणांवर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): पीपल्स एज्युकेश सोसायटीच्या नागसेवन परिसरातील मिलिंद कला महाविद्यालयाच्या महिला प्राचार्यांना एका तृतीयपंथीयासह सात ते आठ जणांनी अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्यांच्या दालनात बसलेल्या असताना कुणाल सुनील दांडगे आणि एका तृतीयपंथीय इसमासह सात ते आठ जणांनी आपल्या दालनात येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आणि शासकीय कामात अडथळा आणला, अशी फिर्याद मिलिंद कला महाविद्यालयाच्या महिला प्राचार्यांनी छावणी पोलिसांत दिली आहे. महिला प्राचार्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कुणाल दांडगे यांच्यासोबत एक तृतीयपंथीय इसम प्राचार्यांच्या दालनात आला. त्याला काही मुलांनी घेऊन जाऊन मारहाण केली, अशी तक्रार त्याने प्राचार्यां...
संभाजीनगरचे विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर तडकाफडकी कार्यमुक्त, डॉ. रणजितसिंह निंबाळकरांकडे पुन्हा कार्यभार!
महाराष्ट्र

संभाजीनगरचे विभागीय सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर तडकाफडकी कार्यमुक्त, डॉ. रणजितसिंह निंबाळकरांकडे पुन्हा कार्यभार!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सुरेंद्र ठाकूर यांना पदावरून तडकाफडकी कार्यमुक्त करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्याच (औरंगाबाद) शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेतील प्राध्यापक डॉ. रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडे पुन्हा एकदा विभागीय सहसंचालकपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी शुक्रवारी हा आदेश जारी केला. डॉ. सुरेंद्र ठाकूर यांनी २ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय सहसंचालकपदाचा कार्यभार स्वीकारला होता. कार्यभार स्वीकारल्यापासूनच त्यांची कामकाजाची पद्धती वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. न्यूजटाऊनने त्यांच्या वादग्रस्त कार्यपद्धतीवर वारंवार बोट ठेवले होते. उच्च शिक्षण संचालक डॉ. देवळाणकर यांनी  २० जुलै २०२३ रोजी डॉ. ठाकूर यांच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते. ...
स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी आता करा ऑनलाइन तक्रार, सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केली ‘आमची मुलगी’ वेबसाईट
महाराष्ट्र

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी आता करा ऑनलाइन तक्रार, सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केली ‘आमची मुलगी’ वेबसाईट

मुंबई: राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याकरिता व स्त्री भ्रूण हत्या रोखण्याकरिता राज्यात तक्रार नोंदवण्यासाठी ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु करण्यात येत आहे.या संकेतस्थळामुळे राज्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ (पीसीपीएनडीटी आणि एम.टी.पी) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मदत होणार आहे. पीसीपीएनडीटी आणि एमटीपी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता विविध उपक्रम आणि उपाययोजना यशस्वीपणे राबविण्यासाठी विविध योजनांची कार्यवाही करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी तसेच याविषयी कुठल्याही शंके...
खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना १ जानेवारीपासून लागू करण्याचा निर्णय
महाराष्ट्र

खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना १ जानेवारीपासून लागू करण्याचा निर्णय

मुंबई: शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील खासगी संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या ११ मार्च २०२४ रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात येऊन आज याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही. तसेच थकबाकी देय होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वित्त विभागाच्या १ एप्रिल २०१० रोजीच्या शासन निर्णयान्वये सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेमध्ये सुधारणा करुन शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. याद्वारे १२ वर्षे व २४ वर्षाच्या नियमित सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्या...
रविवारी संभाजीनगरात दलित अजेंडा परिषद, अनुसूचित जातीच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आव्हानांवर होणार विचारमंथन
महाराष्ट्र

रविवारी संभाजीनगरात दलित अजेंडा परिषद, अनुसूचित जातीच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आव्हानांवर होणार विचारमंथन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):   अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघाच्या (आईस्का) वतीने  येत्या रविवारी (१७ मार्च) छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) दलित अजेंडा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत आंबेडकरी अभ्यासक आणि तळागाळातील आंबेडकरी कार्यकर्ते दलित अजेंड्यावर विचारमंथन करणार आहेत. समानतेवर आधारित सशक्त भविष्य निर्मितीसाठी आईस्काच्या वतीने दलित अजेंडा परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दलित अजेंडा परिषदेनंतर येत्या रविवारी छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) दलित अजेंडा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील आंबेडकरवादी नेते आणि अभ्यासकांच्या विचारमंथनातून व्यापक आणि सर्वंकष दलित अजेंडा निश्चित करण्याचा या परिषदेचा हेतू आहे. रविवारी खोकडपुऱ्यातील शासकीय दूध डेअरी शेजारील मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात सकाळी साडेदहा त...
पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारे भीम आर्मीचे सोलापूर शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर दोन वर्षांसाठी तडीपार
महाराष्ट्र

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारे भीम आर्मीचे सोलापूर शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर दोन वर्षांसाठी तडीपार

सोलापूरः बेरोजगारी, आरक्षण आणि खासगीकरणाच्या मुद्यावर सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पोलिसांसमक्ष काळा झेंडा दाखवून त्यांच्या अंगावर शाईफेक केल्यामुळे पाच महिन्यांपूर्वी चर्चेत आलेले भीम आर्मीचे सोलापूर शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांना अखेर सोलापूर पोलिसांनी सोलापूर आणि नजीकच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. अजय मैंदर्गीकर हे आक्रमक आंबेडकरी कार्यकर्ते असून भीम आर्मी संघटनेच्या माध्यमातून ते विविध प्रश्नांवर आक्रमकपणे आंदोलने करतात. गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात आले असता अजय मैंदर्गीकर (वय २६ वर्षे) यांनी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था भेदून पालकमंत्री पाटलांसमोर अचानकपणे काळा झेंडा दाखवून निषेधाच्...
कारागृहातील कैद्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी राज्यमाफी योजना, वाचा कशी आणि कोणाला मिळणार राज्यमाफी?
महाराष्ट्र

कारागृहातील कैद्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी राज्यमाफी योजना, वाचा कशी आणि कोणाला मिळणार राज्यमाफी?

मुंबई: केंद्र शासनाच्या धोरणानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशिष्ट प्रवर्गातील व विहित निकषांची पूर्तता करणाऱ्या शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना शिक्षेत राज्यमाफी देण्यात येत आहे. त्यानुसार शिक्षा कालावधी समाप्त होण्यापूर्वीच कैद्यांची मुदतपूर्व मुक्तता होऊन ते आपल्या कुटुंबात गेले आहेत. कारागृहातील चांगली वागणूक हा राज्यमाफी या योजनेचा मूलभूत निकष आहे. कारागृहात असताना वर्तनात सुधारणा करून कारागृहातून मुक्त होण्याच्या दृष्टीने कैद्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे कारागृहाचे ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरले आहे. माफी देताना प्रत्येक कैद्याच्या साधारण माफी अधिक विशेष माफी ही त्याच्या पूर्ण अथवा शिक्षा कालावधीच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त होणार नाही, याची कारागृह प्रशासनाला दक्षता घ्यावयाची आहे. जन्मठेपेची शिक्षा किंवा देहांत शिक्षा फौजदारी दं...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!