महाराष्ट्र

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आठ उमेदवार जाहीर, वाचा कोणाचे कापले तिकिट? कोणा-कोणाला मिळाली संधी?
महाराष्ट्र, राजकारण

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे आठ उमेदवार जाहीर, वाचा कोणाचे कापले तिकिट? कोणा-कोणाला मिळाली संधी?

मुंबईः लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या ८ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. रामटेकवगळता इतर सात लोकसभा मतदारसंघात सात विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरमधून संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात नसताना त्यांचा पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या आठ उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे ठाणे आणि कल्याण हा मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र पहिल्या यादीत या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आलेली नाही. यवतमाळ- वाशिम लोकसभा मतदारसंघाचाही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. कल्याण आणि ठाणे हा मुख्यमंत्री शिंदेंचा बालेकिल्ला मानला जात असला तरी या दोन्ही मतदारसंघांसाठी भाजप आग्रही आहे. या दोन मतदारसंघा...
महाविकास आघाडीला धक्का, वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले ८ उमेदवार; मराठा, ओबीसींशी संधान बांधून लढणार लोकसभा!
महाराष्ट्र, राजकारण

महाविकास आघाडीला धक्का, वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले ८ उमेदवार; मराठा, ओबीसींशी संधान बांधून लढणार लोकसभा!

अकोलाः वंचित बहुजन आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ओबीसी महासंघाशी युती करून वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रातील मतदारांसमोर तिसरा पर्याय ठेवला असून आठ उमेदवारांची यादीही जाहीर केली आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत राज्यात तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीतून बाहेर पडले का? या प्रश्नाचे उत्तर मात्र प्रकाश आंबेडकरांनी दिले नाही. प्रकाश आंबेडकर यांनी आज अकोला येथे पत्रकार परिषद घेऊन वंचित बहुजन आघाडीची भूमिका जाहीर केली. वंचित बहुजन आघाडीच्या राज्य समितीची काल बैठक घेतली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत आम्ही काही निर्णय घेतले. आमच्यासोबत जे आघाडी करण्यासाठी इच्छूक होते, त्यांना आम्ही सांगितले की, महाराष्ट्रात जरांगे पाटील फॅक्टर लक्षात घ्या. पण तो फॅक्टर लक्षात घेतला गेला नाही. जरांगे पाटील यांच्याशी काल आमची बैठक झाली. पहिल्या टप्प्...
शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाची दोन्ही वसतिगृहे बेवारस, एका  अधीक्षकाला ‘मलिद्या’ची जागा सोडवेना, तर दुसरा निवृत्तीच्या वाटेवर!
महाराष्ट्र

शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाची दोन्ही वसतिगृहे बेवारस, एका अधीक्षकाला ‘मलिद्या’ची जागा सोडवेना, तर दुसरा निवृत्तीच्या वाटेवर!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  येथील शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) विभागीय कार्यालयातच ठिय्या मारून बसले आहेत तर मुलींच्या वसतिगृहाचे अधीक्षक येत्या ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे या दोन्ही वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. विशेष म्हणजे महाविद्यालय प्रशासनाने सहसंचालक कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या अधीक्षकाला परत पाठवण्याची विनंती वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगरच्या (औरंगाबाद) किलेअर्क परिसरात शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थी- विद्यार्थिनींसाठी दोन स्वतंत्र वसतिगृहे आहेत. मुलांच्या वसतिगृहाचे अधीक्षक अशोक कुलकर्णी हे फेब्रुवारी-मार्च २०२३ पासून विभागीय सहसंचालक ...
लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कोणाला मिळाली कोणत्या मतदारसंघात संधी?
महाराष्ट्र, राजकारण

लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची १७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, वाचा कोणाला मिळाली कोणत्या मतदारसंघात संधी?

मुंबईः  शिवसेनेच्या ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर ही यादी पोस्ट करत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे १७ उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना नेमक्या किती जागा लढवणार हे अद्याप अस्पष्ट आहे. याआधी काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभेचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाने १७ उमेदवार जाहीर केले आहेत. ठाकरे गटाचे १७ उमेदवार असे हिंगोलीः नागेश पाटील आष्टीकर  छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  चंद्रकांत खैरे धाराशिव (उस्मानाबाद):  ओमराजे निंबाळकर परभणीः संजय जाधव बुलढाणाः नरेंद्र खेडकर यवतमाळ-वाशिमः संजय देशमुख माव...
कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर, सुट्टी न दिल्यास होणार कारवाई
महाराष्ट्र

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी जाहीर, सुट्टी न दिल्यास होणार कारवाई

मुंबई: राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. याबाबतचे परिपत्रक राज्य शासनाने जारी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे व २० मे, अशा पाच टप्प्यात या निवडणुकीचे मतदान होणार आहे. भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या आदेशाप्रमाणे राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक घेतली जाणार आहे. या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क योग्यरितीने बजावता यावा, यासाठी परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या आदेशानुसार निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाह...
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द, हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय
महाराष्ट्र, राजकारण

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक रद्द, हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय

नागपूर: अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची अधिसूचना रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आज दिले. या पोटनिवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकेवर हा निर्ण देण्यात आला. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला एक वर्षापेक्षा कमी कालावधी असताना पोटनिवडणूक घेताच येत नाही, अशी कायद्यात तरतूद असल्याचा दावा करत अनिल दुबे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले होते. या याचिकेवर न्या. अनिल किलोर व एम.एस.जवळकर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. विधानसभा निवडणूक पाच-सहा महिन्यांवर असताना अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याची काय गरज आहे? ही पोटनिवडणूक घेऊन मतदारांना वेठीस धरले जात आहे आणि यंत्रणांवर अनावश्यक भार दिला जात आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याच्या वतीने करण्यात आला. चंद्रपूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघात एक वर्षाहून अधिक ...
हिंगोलीत हेमंत पाटलांचा पत्ता कट? जागा भाजपकडे घेण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीसच घालणार केंद्रीय नेतृत्वाला गळ, तिढा कायम!
महाराष्ट्र, राजकारण

हिंगोलीत हेमंत पाटलांचा पत्ता कट? जागा भाजपकडे घेण्यासाठी खुद्द देवेंद्र फडणवीसच घालणार केंद्रीय नेतृत्वाला गळ, तिढा कायम!

मुंबईः  हिंगोली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यात चांगलीच ओढाताण सुरू आहे. हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे अर्ध्या डझनाहून अधिक इच्छुक उमेदवार आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन हिंगोलीत पुन्हा ही जागा हेमंत पाटलांना सोडण्यास विरोध दर्शवला. हिंगोलीची जागा भाजपसाठी सोडवून घ्या, आम्ही ती जिंकून दाखवू, असा विश्वासही भाजप पदाधिकाऱ्यांनी फडणवीसांना दिला. हिंगोलीची जागा आपण कशी जिंकू शकतो, हे मी केंद्रीय नेतृत्वाला पटवून देतो. त्यानंतर वरिष्ठ नेते निर्णय घेतील, असे आश्वासन फडणवीसांनी दिल्याचे भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे हेमंत पाटलांच्या जागेवर टांगती तलवार आहे. महायुतीचे घटकपक्ष असलेल्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील जागावाटपाचा तिढा...
 प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही? शिवसेनेसोबतची युती तोडून ४ जागांची ऑफर परत करत म्हणाले…
महाराष्ट्र, राजकारण

 प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसोबत जाणार की नाही? शिवसेनेसोबतची युती तोडून ४ जागांची ऑफर परत करत म्हणाले…

मुंबईः लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. काही मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. तरीही महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत युती करणार की नाही? हे अद्याप अस्पष्ट असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत सविस्तर भूमिका मांडली आणि २६ मार्चपर्यंत काय तो निर्णय घ्या, अन्यथा आम्ही आमची भूमिका जाहीर करू, अशी डेडलाईनही त्यांनी मविआला दिली. शिवसेनेसोबत वंचितची युती संपुष्टात आल्याची घोषणाही त्यांनी केली. महाविकास आघाडीला त्यांच्यातील जागावाटपाचा तिढा सोडवता येत नाही. त्यांनी आम्हाला चार जागा देऊ केल्या. त्या जागा मी त्यांना परत करतो. महाविकास आघाडीने २६ मार्चपर्यंत काय तो निर्णय घ्यावा. आम्हाला कळवावे. अन्यथा २६ मार्चला आम्ही आमची भूमिका जाहीर करू. २७ मार...
होळीनंतर राज्यात कडक उन्हाळा, पुढचे चार दिवस काळजीचे!
महाराष्ट्र

होळीनंतर राज्यात कडक उन्हाळा, पुढचे चार दिवस काळजीचे!

मुंबईः  होळीनंतर महाराष्ट्रात तापमानात वाढ होऊन कडक उन्हाळा जाणवेल. पुढचे चार दिवस तापमानात वाढ होण्याची शक्यता असून काळजी घेण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. २७ मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि विदर्भासह राज्याच्या अनेक भागात उन्हाची काहिली जाणवण्याची शक्यता आहे. राज्यात उन्हाचा कडाका वाढू लागला आहे. काही ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा बसला असला तरी राज्याच्या उर्वरित भागात तापमान ३९ अंश सेल्सिअसच्या वर गेल्याने उकाडा वाढला आहे. या तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. देशभरात एकीकडे होळी साजरी करण्याची लगबग सुरू असताना महाराष्ट्रासह अन्य काही राज्यात उष्णतेत वाढ होत आहे. यंदाच्या होळीवर उष्णतेचा दाह जाणवेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. कोरड्या हवामानामुळे कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. तामिळनाडू ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती कायम आहे. त्य...
डॉ. शंकर अंभोरे यांचे अधिसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला हाय कोर्टाची स्थगिती; कुलगुरू, कुलसचिवांच्या मनमानीला चपराक!
महाराष्ट्र

डॉ. शंकर अंभोरे यांचे अधिसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या निर्णयाला हाय कोर्टाची स्थगिती; कुलगुरू, कुलसचिवांच्या मनमानीला चपराक!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): प्रवर्ग बदलल्याचे कारण देऊन खुलताबाद येथील कोहिनूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्यत्व रद्द करण्याच्या विद्यापीठ प्रशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाचा हा निर्णय कुलगुरू डॉ. विजय फुलारी आणि कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी केलेल्या मनमानीला जबर चपराक मानला जात आहे. डॉ. शंकर अंभोरे हे जालन्याच्या दानकुंवर महिला महाविद्यालयात प्राध्यापक असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेवर अध्यापक गणातून निवडून आले होते.  पुढे अंभोरे हे ३ मे २०२३ रोजी खुलताबाद येथील येथील कोहिनूर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी रूजू झाले. अध्यापक गणातून अधिसभेवर निवडून आलेले डॉ. अंभोरे हे प्राचार्य झाल्यामुळे...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!