महाराष्ट्र

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का, उत्कर्षा रुपवतेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी; लवकरच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार?
महाराष्ट्र, राजकारण

पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का, उत्कर्षा रुपवतेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी; लवकरच वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार?

शिर्डीः पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला आणखी एक धक्का बसला आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेल्या आणि महाविकास आघाडीत शिर्डीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटल्यामुळे नाराज झालेल्या काँग्रेसच्या महासचिव उत्कर्षा रूपवते यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. उत्कर्षा रूपवते लवकरच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असल्याची चर्चा असून वंचितच्याच तिकिटावर त्या शिर्डीतून त्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. शिर्डी लोकसभेची जागा काँग्रेस पक्षाला मिळावी,अशी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची मागणी होती. उत्कर्षा रूपवते या शिर्डीमधून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी आग्रही होत्या. परंतु महाविकास आघाडीत शिर्डीची जागा शिवसेना ठाकरे गटाला सोडण्यात आली आहे. त्यामुळे त्या नाराज नाराज होत्या....
डॉ. जयश्री सूर्यवंशींना भरावे लागणार बनावट जातप्रमाणपत्रावर नऊ वर्षे लाटलेले वेतन, इं.भा.पा. महाविद्यालयाने बजावली नोटीस
महाराष्ट्र

डॉ. जयश्री सूर्यवंशींना भरावे लागणार बनावट जातप्रमाणपत्रावर नऊ वर्षे लाटलेले वेतन, इं.भा.पा. महाविद्यालयाने बजावली नोटीस

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  राजपूत भामटा जातीचे बनावट जातप्रमाणपत्र हस्तगत करून त्याआधारे डॉ. सौ. इंदिराबाई भास्करराव पाठक महिला महाविद्यालयात अधिव्याख्यात्याची नोकरी मिळवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माजी कुलसचिव आणि याच विद्यापीठातील वाणिज्य विभागातील प्राध्यापक डॉ. जयश्री सूर्यवंशी यांना बनावट जातप्रमाणपत्राआधारे आधारे १९९९ ते २००८ अशी नऊ वर्षे शासनाच्या तिजोरीतून लाटलेल्या वेतनाची रक्कम भरावी लागणार आहे. महाविद्यालयाने त्यांना वसुलीची नोटीस बजावली असून १५ दिवसांच्या आत नोटिशीला उत्तर न दिल्यास वसुलीची कार्यवाही सुरू केली जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे.  डॉ. जयश्री सूर्यवंशी या जन्माने मराठा जातीच्या आहेत. आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्यांनी राजपूत भामटा जातीचे बनावट जातप्रमाणपत्र हस्तगत केले आणि याच बनावट जातप्रमाणपत्राच्या आधारे त्यांनी १९९३ मध्ये डॉ. इं.भा...
एमआयएमचा ‘वंचित’ला पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांच्या विजयासाठी काम कराः ओवैसींचे कार्यकर्त्यांना आदेश; नव्या समीकरणाची नांदी?
महाराष्ट्र, राजकारण

एमआयएमचा ‘वंचित’ला पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांच्या विजयासाठी काम कराः ओवैसींचे कार्यकर्त्यांना आदेश; नव्या समीकरणाची नांदी?

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  अकोला लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांना एमआयएमने पाठिंबा जाहीर केला आहे. अकोला मतदारसंघातील एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विजयासाठी काम करावे, असे निर्देश एमआयएमचे नेते खा. असदुद्दीन ओवैसी यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. एमआयएमने स्वतःहोऊन केलेल्या या घोषणेमुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेले एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा आता महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुरू होण्याची शक्यता आहे. एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून एमआयएमचे इम्तियाज जलील हे एकमेव खासदार विजयी झाले होते. खा. जलील यांच्या विजयात औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील आंबेडकरी मतदारांचा मोठा वाटा होता. ते पुन्हा औरंगाबाद लोकसभा मतदारसं...
‘अनफिट’ डॉ. मझहर फारुकींची प्राचार्यपदी नियमबाह्य पुनर्नियुक्ती, आक्षेपांवर तीन वर्षांपासून विद्यापीठ प्रशासनाकडून शून्य कारवाई!
महाराष्ट्र, विशेष

‘अनफिट’ डॉ. मझहर फारुकींची प्राचार्यपदी नियमबाह्य पुनर्नियुक्ती, आक्षेपांवर तीन वर्षांपासून विद्यापीठ प्रशासनाकडून शून्य कारवाई!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  अनुत्तीर्ण अफगाणी विद्यार्थीनीला नियमबाह्य पदवी दिल्याच्या घोटाळ्याचा मुख्यसूत्रधार आणि मौलाना आझाद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मझहर फारूकी हे ‘शारीरिकदृष्ट्या अनफिट’ असतानाही त्यांची याच महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी दुसऱ्या टर्मसाठी नियमबाह्य पुनर्नियुक्ती करण्यात आली. त्यांची शारीरिक क्षमता आणि पुनर्नियुक्तींवर २०२१ पासून ५० हून अधिक लेखी आक्षेप नोंदवण्यात येऊनही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने कोणतीही कारवाई केली नसल्याची धक्कादायक माहिती ‘न्यूजटाऊन’च्या हाती आली आहे. रोझाबाग येथील मौलाना आझाद शिक्षण संस्थेच्या मौलाना आझाद कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यमान प्राचार्य डॉ. मझहर फारूकी हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्या शाखेचे अधिष्ठाता असताना त्यांनी २०१८-१...
मंत्रालयातील चावीवाला आपला दोस्त, पाहिजे तेव्हा तिजोरी खोलतोः भाजप आमदाराचा खळबळजनक दावा; फडणवीसांचाही उल्लेख करत म्हणाले…
महाराष्ट्र, राजकारण

मंत्रालयातील चावीवाला आपला दोस्त, पाहिजे तेव्हा तिजोरी खोलतोः भाजप आमदाराचा खळबळजनक दावा; फडणवीसांचाही उल्लेख करत म्हणाले…

जळगावः मंत्रालयातील चावीवाला आपला दोस्त आहे. आपल्याला पाहिजे तेव्हा तिजोरी खोलतो आणि दणदणाट पैसे वाटतो, असा खळबळजनक दावा भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी केला आहे. हा दावा करताना त्यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडवणीस यांचाही उल्लेख केला आहे. सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढला आहे. आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदावे करून मतदारांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न प्रत्येकच राजकीय पक्षाचे नेते आणि उमेदवारांकडून केला जात असतानाच काही जणांचा तोल सुटत आहे तर काही जण खळबळजनक विधाने करून वाद ओढवून घेत आहेत. चाळीसगावचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी राज्याच्या तिजोरीबाबत असाच वादग्रस्त दावा केला आहे. त्यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेतच चाळीसगावचे भाजपचे आमदार मंगेश च...
‘वंचित’च्या जाहीरनाम्यात शिक्षणावर ९ टक्के तरतूद, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण, कापसाला ९ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन
महाराष्ट्र, राजकारण

‘वंचित’च्या जाहीरनाम्यात शिक्षणावर ९ टक्के तरतूद, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण, कापसाला ९ हजार रुपये भाव देण्याचे आश्वासन

अकोला: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे आज पत्रकार परिषद घेऊन पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. शिक्षणावर ९ टक्के तरतूद, ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण आणि कापसाला ९ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्याचे आश्वासन वंचित बहुजन आघाडीने आपल्या जाहीरनाम्यात दिले आहे. सीएए आणि एनआरसी हे मुस्लिमांच्या विरोधात असल्याचे भाजपकडून भासवले जात असले तरी ते देशातील २० टक्के हिंदूंच्याच विरोधातील कायदे आहेत, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केला. वंचित बहुजन आघाडीच्या जाहीरनाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे आता एनआरसी (NRC)  आणि सीएए (CAA) यांची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. हे दोन्ही कायदे पूर्णतः असंवैधानिक आहेत. हा कायदा मुस्लिमांच्या विरोधात आहे, असे भाजपकडून भासवले जात आहे. पण त्याचा सर्वांत मोठा परिणाम हा हिंदू समाजातील जुन्या ...
हिंगोली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बाबुराव कोहळीकरांच्या विरोधात मतदारांचा रोष, प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना पिटाळले!
महाराष्ट्र, राजकारण

हिंगोली मतदारसंघात महायुतीचे उमेदवार बाबुराव कोहळीकरांच्या विरोधात मतदारांचा रोष, प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना पिटाळले!

उमरखेडः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचत चालली असतानाच ठिकठिकाणचे मतदार सत्ताधारी पक्षाबद्दल आपला रोष व्यक्त करत आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप नेते अशोक चव्हाण यांना मतदारांच्या रोषाला सामोरे लागण्याची घटना ताजी असतानाच हिंगोली लोकसभा मतदारसंघातही सत्ताधारी महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या विरोधातही मतदारांचा रोष पहायला मिळू लागला आहे. उमरखेड तालुक्यातील मतदारांनी आष्टीकरांच्या प्रचारासाठी आलेल्या नेत्यांना पिटाळून लावले. मतदारांचा हा रोष कोहळीकरांसमोरील अडचणी वाढवणारा ठरण्याची शक्यता आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाकडून आधी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. हेमंत पाटलांच्या उमेदवारीला भाजपने केलेला विरोध आणि उमेदवारी बदलण्यासाठी टाकलेल्या दबावामुळे अखेर शिवसेनेच्या शिंदे गटाने त्यांचा पत्ता का...
अकोल्यात मुस्लिमविरोधी नफरतीचा समर्थक आघाडीचा उमेदवार कसा?, प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्याः कपिल पाटलांचे पवारांना पत्र
महाराष्ट्र, राजकारण

अकोल्यात मुस्लिमविरोधी नफरतीचा समर्थक आघाडीचा उमेदवार कसा?, प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्याः कपिल पाटलांचे पवारांना पत्र

मुंबईः अकोला लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार डॉ. अभय पाटील हे बाबरी मशीद पाडण्याचे आणि मुस्लिमविरोधी नफरतीचे आजही समर्थन करतात. तरीही ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, हे धक्कादायक आहे. डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारस प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात काँग्रेसचा उमेदवार देऊन आपण मोठी चूक करत आहोत. अकोल्यात प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा देऊन काँग्रेसने केलेल्या ऐतिहासिक चुकांचे पापक्षालन करण्याची याशिवाय दुसरी वेळ नाही, असे असे समाजवादी गणराज्य पार्टीचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी म्हटले आहे. समाजवादी गणराज्य पार्टी हा महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. नव्यानेच स्थापन झालेल्या या पक्षाचे अध्यक्ष कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना अनावृत्त पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा देण्याचा द...
बंडू जाधव तू फार छोटा माणूस, माझ्या नादाला लागू नको फार अवघड होईल तुझेः महादेव जानकरांची बंडू जाधवांना थेट धमकी
महाराष्ट्र, राजकारण

बंडू जाधव तू फार छोटा माणूस, माझ्या नादाला लागू नको फार अवघड होईल तुझेः महादेव जानकरांची बंडू जाधवांना थेट धमकी

परभणीः मला उपरा आणि परका म्हणू नको. बंडू जाधव तू फार छोटा माणूस आहेस. माझ्या नादाला लागू नको. फार अवघड होईल तुझे, अशा शब्दांत महायुतीचे परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार महादेव जानकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांना धमकी दिली आहे. महादेव जानकर यांनी आज पूर्णा तालुक्यातील गावोगावी जाऊन प्रचार केला आणि ग्रामस्थांच्या भेटी घेतल्या. त्यांच्यासोबत आमदार रत्नाकर गुट्टे, राजेश विटेकर इत्यादी महायुतीचे पदाधिकारी होते. यावेळी ग्रामस्थांना संबोधित करताना त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय उर्फ बंडू जाधव यांना थेट धमकीच देऊन टाकली. मी हिंद केसरीबरोबर लढाई लढली आहे. शरद पवार, वसंतदादा पाटील, शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात मी निवडणूक लढलो आहे. नांदेड, सांगली, माढा, बारामतीत निवडणुकीला उभा राहिलो आहे आणि आता गुलाल लावून घ्यायला परभणीला आलो आहे. मी कांशीराम यांच्यासोबत सा...
भाजपने एकनाथ शिंदे, अजित पवारांना स्टारप्रचारकांच्या यादीतून वगळले!
महाराष्ट्र, राजकारण

भाजपने एकनाथ शिंदे, अजित पवारांना स्टारप्रचारकांच्या यादीतून वगळले!

मुंबईः लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी शिगेला पोहोचत असतानाच भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपल्या स्टारप्रचारकांच्या यादीतून वगळून टाकले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या पत्रानंतर भाजपने हे पाऊल उचलले आहे. केवळ आपल्याच पक्षातील नेत्यांचा स्टारप्रचारकांच्या यादीत समावेश असावा, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यापार्श्वभूमीवर या दोघांची नावे भाजपने वगळली आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र पाठवले आहे. लोकप्रतिनिधी कायदा १९५० मधील तरतुदींनुसार स्टारप्रचारक हे त्याच पक्षाचे असले पाहिजे, असा नियम आहे. या तरतुदींनुसार कार्यवाही करण्याचे आदेश निवडणूक आयुक्तांनी सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले आहेत. भाजपने २६ मार्च रोजी ४० स्टारप्रचारकांची यादी नि...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!