महाराष्ट्र

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी आता करा ऑनलाइन तक्रार, सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केली ‘आमची मुलगी’ वेबसाईट
महाराष्ट्र

स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी आता करा ऑनलाइन तक्रार, सार्वजनिक आरोग्य विभागाने सुरू केली ‘आमची मुलगी’ वेबसाईट

मुंबई: राज्यातील गर्भलिंग निदान प्रतिबंध, लिंग गुणोत्तर प्रमाण वाढविण्याकरिता व स्त्री भ्रूण हत्या रोखण्याकरिता राज्यात तक्रार नोंदवण्यासाठी ‘आमची मुलगी’ संकेतस्थळ सुरु करण्यात येत आहे.या संकेतस्थळामुळे राज्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ (पीसीपीएनडीटी आणि एम.टी.पी) ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मदत होणार आहे. पीसीपीएनडीटी आणि एमटीपी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरिता विविध उपक्रम आणि उपाययोजना यशस्वीपणे राबविण्यासाठी विविध योजनांची कार्यवाही करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्यानुसार गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ सुधारित कायदा २००३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी व स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यात तक्रार नोंदविण्यासाठी तसेच याविषयी कुठल्याही शंके...
खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना १ जानेवारीपासून लागू करण्याचा निर्णय
महाराष्ट्र

खासगी मान्यताप्राप्त शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना १ जानेवारीपासून लागू करण्याचा निर्णय

मुंबई: शालेय शिक्षण विभागांतर्गत राज्यातील खासगी संस्थामार्फत चालवण्यात येणाऱ्या मान्यताप्राप्त प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दोन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना १ जानेवारी २०२४ पासून लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या ११ मार्च २०२४ रोजी झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात येऊन आज याबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू राहणार नाही. तसेच थकबाकी देय होणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. वित्त विभागाच्या १ एप्रिल २०१० रोजीच्या शासन निर्णयान्वये सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेमध्ये सुधारणा करुन शासकीय कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. याद्वारे १२ वर्षे व २४ वर्षाच्या नियमित सेवेनंतर राज्य शासकीय कर्मचाऱ्या...
रविवारी संभाजीनगरात दलित अजेंडा परिषद, अनुसूचित जातीच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आव्हानांवर होणार विचारमंथन
महाराष्ट्र

रविवारी संभाजीनगरात दलित अजेंडा परिषद, अनुसूचित जातीच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय आव्हानांवर होणार विचारमंथन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):   अखिल भारतीय स्वतंत्र अनुसूचित जाती संघाच्या (आईस्का) वतीने  येत्या रविवारी (१७ मार्च) छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) दलित अजेंडा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेत आंबेडकरी अभ्यासक आणि तळागाळातील आंबेडकरी कार्यकर्ते दलित अजेंड्यावर विचारमंथन करणार आहेत. समानतेवर आधारित सशक्त भविष्य निर्मितीसाठी आईस्काच्या वतीने दलित अजेंडा परिषदेचे आयोजन करण्यात येत आहे. मुंबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दलित अजेंडा परिषदेनंतर येत्या रविवारी छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) दलित अजेंडा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील आंबेडकरवादी नेते आणि अभ्यासकांच्या विचारमंथनातून व्यापक आणि सर्वंकष दलित अजेंडा निश्चित करण्याचा या परिषदेचा हेतू आहे. रविवारी खोकडपुऱ्यातील शासकीय दूध डेअरी शेजारील मराठवाडा महसूल प्रबोधिनीच्या सभागृहात सकाळी साडेदहा त...
पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारे भीम आर्मीचे सोलापूर शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर दोन वर्षांसाठी तडीपार
महाराष्ट्र

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणारे भीम आर्मीचे सोलापूर शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर दोन वर्षांसाठी तडीपार

सोलापूरः बेरोजगारी, आरक्षण आणि खासगीकरणाच्या मुद्यावर सोलापूरचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना पोलिसांसमक्ष काळा झेंडा दाखवून त्यांच्या अंगावर शाईफेक केल्यामुळे पाच महिन्यांपूर्वी चर्चेत आलेले भीम आर्मीचे सोलापूर शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांना अखेर सोलापूर पोलिसांनी सोलापूर आणि नजीकच्या धाराशिव (उस्मानाबाद) जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. अजय मैंदर्गीकर हे आक्रमक आंबेडकरी कार्यकर्ते असून भीम आर्मी संघटनेच्या माध्यमातून ते विविध प्रश्नांवर आक्रमकपणे आंदोलने करतात. गेल्या वर्षी १५ ऑक्टोबर २०२३ रोजी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात आले असता अजय मैंदर्गीकर (वय २६ वर्षे) यांनी पोलिसांची सुरक्षा व्यवस्था भेदून पालकमंत्री पाटलांसमोर अचानकपणे काळा झेंडा दाखवून निषेधाच्...
कारागृहातील कैद्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी राज्यमाफी योजना, वाचा कशी आणि कोणाला मिळणार राज्यमाफी?
महाराष्ट्र

कारागृहातील कैद्यांच्या मुदतपूर्व सुटकेसाठी राज्यमाफी योजना, वाचा कशी आणि कोणाला मिळणार राज्यमाफी?

मुंबई: केंद्र शासनाच्या धोरणानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विशिष्ट प्रवर्गातील व विहित निकषांची पूर्तता करणाऱ्या शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना शिक्षेत राज्यमाफी देण्यात येत आहे. त्यानुसार शिक्षा कालावधी समाप्त होण्यापूर्वीच कैद्यांची मुदतपूर्व मुक्तता होऊन ते आपल्या कुटुंबात गेले आहेत. कारागृहातील चांगली वागणूक हा राज्यमाफी या योजनेचा मूलभूत निकष आहे. कारागृहात असताना वर्तनात सुधारणा करून कारागृहातून मुक्त होण्याच्या दृष्टीने कैद्यांना प्रोत्साहन मिळाले आहे. त्यामुळे कारागृहाचे ‘सुधारणा व पुनर्वसन’ हे ब्रीदवाक्य सार्थ ठरले आहे. माफी देताना प्रत्येक कैद्याच्या साधारण माफी अधिक विशेष माफी ही त्याच्या पूर्ण अथवा शिक्षा कालावधीच्या एक तृतीयांश पेक्षा जास्त होणार नाही, याची कारागृह प्रशासनाला दक्षता घ्यावयाची आहे. जन्मठेपेची शिक्षा किंवा देहांत शिक्षा फौजदारी दं...
सरकारी नोकऱ्यांत अर्धा वाटा ते दरमहिन्याला ८ हजार रुपये आर्थिक मदत, काँग्रेसच्या महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा
देश, महाराष्ट्र

सरकारी नोकऱ्यांत अर्धा वाटा ते दरमहिन्याला ८ हजार रुपये आर्थिक मदत, काँग्रेसच्या महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा

नवी दिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी ‘नारी न्याय गॅरंटी’ योजनेची घोषणा केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खारगे यांनी या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत काँग्रेसने सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना अर्धा वाटा देण्याची तसेच एका गरीब कुटुंबातील एका महिलेला दरवर्षी १ लाख रुपये म्हणजेच दरमहिन्याला ८ हजार रुपयांहून अधिकची आर्थिक मदत देण्याची हमी दिली आहे. काँग्रेस आज नारी न्याय गॅरंटीची घोषणा करत आहे. याअंतर्गत काँग्रेस पार्टी महिलांसाठी देशात एक नवा अजेंडा निश्चित करत आहे. नारी न्याय गॅरंटी योजनेअंतंर्गत काँग्रेस पाच घोषणा करत आहे. त्यात महालक्ष्मी गॅरंटी, आधी आबादी-पुरा हक, शक्ती सन्मान, अधिकार मैत्री आणि सावित्रीबाई फुले वसतिगृह योजनेचा समावेश आहे, असे मल्लिकार्जुन खारगे यांनी म्हटले आहे. यापू...
पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट ३४ गावांना आकारला वाढीव तीन ते दहापट मिळकतकर, आता ग्रामपंचायतीच्या दराने करवसुलीचे निर्देश
महाराष्ट्र

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट ३४ गावांना आकारला वाढीव तीन ते दहापट मिळकतकर, आता ग्रामपंचायतीच्या दराने करवसुलीचे निर्देश

मुंबई:  पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट ३४ गावांतील निवासी तसेच बिगरनिवासी मिळकतींना पूर्वीच्या ग्रामपंचायतीच्या मिळकतकराच्या तीनपट ते दहापट मिळकतकर आकारणे अन्याय्य असून मिळकतदारांना हा कर भरणे शक्य नाही ही वस्तूस्थिती लक्षात घेऊन पुणे महानगरपालिकेचा मिळकतकर पूर्वीच्या ग्रामपंचायतकराच्या दुपटीपेक्षा अधिक नसेल, याची दक्षता घेण्यात यावी. यासंदर्भात कायद्यात सुधारणा करण्याची कार्यवाही तत्काळ सुरु करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज नगरविकास सचिवांसोबत आयोजित बैठकीत दिले. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट ३४ गावातील निवासी-बिगरनिवासी मिळकतींना तीनपट ते दहापट वाढीव कर आकारण्यात आल्याने संबंधित गावांवर अन्याय होत आहे. तो दूर करण्याची मागणी गावकऱ्यांनी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री पवार यांनी आज नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिक...
अहमदनगरचे नाव आता ‘अहिल्यानगर’, तर पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड: राज्य सरकारचा निर्णय
महाराष्ट्र, राजकारण

अहमदनगरचे नाव आता ‘अहिल्यानगर’, तर पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड: राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचेही नाव बदलणात आले असून या तालुक्याला राजगड नाव देण्यात आले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या या बैठकीला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.  या मंत्रिमंडळ बैठकीत अन्य काही निर्णय घेण्यात आले आहेत.ते असे- १. मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर. २. पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये मानधन. ३. राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ. ४. आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ. ५. शुभ...
महायुतीकडून लढण्याचे स्वप्न भंगले, शांतिगीरी महाराज आता महाविकास आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार?
महाराष्ट्र, राजकारण

महायुतीकडून लढण्याचे स्वप्न भंगले, शांतिगीरी महाराज आता महाविकास आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार?

नाशिकः छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वेरूळ मठाचे मठाधिपती शांतिगीर महाराज हे यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे शांतिगिरी महाराजांचे भाजपच्या नेतृत्वातील महायुतीच्या तिकिटावर ही निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगल्यानंतर आता ते महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची बातमी समोर येत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शांतिगिरी महाराज यांनी घोषणा केली आहे. भाजपच्या नेतृत्वातील महायुतीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीसाठी भाजपमधील काही नेतेही आग्रही होते. शांतिगिरी महाराजांनी मुख्य...
छत्रपती संभाजीनगरला राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय, प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक कक्ष
महाराष्ट्र, राजकारण

छत्रपती संभाजीनगरला राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय, प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक कक्ष

मुंबई: राज्यात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्यास तसेच जिल्हास्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिपत्याखाली हे आयुक्तालय असेल. तसेच त्या-त्या जिल्ह्यात जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अल्पसंख्याक कक्ष निर्माण करण्यात येईल.  या अल्पसंख्याक आयुक्तालय कार्यालयासाठी एकूण ३६ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अल्पसंख्याक कक्ष निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली.  प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन अधिकारी हे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी म्हणून काम पाहतील. राज्यातील ३६ जिल्ह्यातील अल्पसंख्याक कक्षाकरिता ए...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!