महाराष्ट्र

 ‘वेळ पडल्यास देशाची राज्यघटनाच बदलू’ परभणीतील महायुतीचे महादेव जानकरांचे वादग्रस्त वक्तव्य, आंबेडकरी संघटनांकडून निषेध
महाराष्ट्र, राजकारण

 ‘वेळ पडल्यास देशाची राज्यघटनाच बदलू’ परभणीतील महायुतीचे महादेव जानकरांचे वादग्रस्त वक्तव्य, आंबेडकरी संघटनांकडून निषेध

परभणीः वेळ पडल्यास आपण देशाची राज्यघटनाच बदलून टाकू, असे वक्तव्य परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार व राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी केल्यामुळे आंबेडकरी संघटनांकडून त्यांचा जोरदार निषेध केला जात आहे. एक वृत्तवाहिनीशी बोलताना जानकरांनी दोन दिवसांपूर्वी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत असून ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत जानकरांना हे वक्तव्य चांगलेच महागात पडण्याची चिनेहे दिसू लागली आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर हे शहरातील नागरिकांच्या गाठीभेटी घेत आहेत. या गाठीभेटीदरम्यान दोन दिवसांपूर्वी ते वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते. त्यावेळी मराठा समाजाचा एक तरूण त्या ठिकाणी आला आणि त्या तरूणाने महादेव जानकरांना मराठा आरक्षाबाबत विचारले. हेही वाचाः स्वतःला ‘फकीर’ म्हणवून घेणा...
 बीड मतदारसंघात तिरंगी लढत,‘वंचित’कडून अशोक हिंगे पाटील मैदानात; पंकजा मुंडेंची वाट अवघड!
महाराष्ट्र, राजकारण

 बीड मतदारसंघात तिरंगी लढत,‘वंचित’कडून अशोक हिंगे पाटील मैदानात; पंकजा मुंडेंची वाट अवघड!

मुंबईः महाराष्ट्रातील ज्या लोकसभा मतदारसंघांच्या लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अशा मतदारसंघांपैकी एक असलेल्या बीड लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीने कुणबी मराठा समाजाचे अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत होणार हे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवार आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांना चांगलीच झुंद द्यावी लागणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकिट कापून माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडीत बीडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला (शरदचंद्र पवार) सुटली असून त्यांनी बजरंगबप्पा सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता बीड लोकसभेच्या मैदानात तिसरा उमेदवार उतरला असून वंचित बह...
स्वतःला ‘फकीर’ म्हणवून घेणाऱ्या जानकरांची संपत्ती किती?; आकडा वाचून तुम्हीही म्हणाल, अशी फकिरी आपल्याही वाट्याला यावी!
महाराष्ट्र, राजकारण

स्वतःला ‘फकीर’ म्हणवून घेणाऱ्या जानकरांची संपत्ती किती?; आकडा वाचून तुम्हीही म्हणाल, अशी फकिरी आपल्याही वाट्याला यावी!

परभणीः आपण फकीर माणूस असून लग्न झालेले नाही, मला घर-दारदेखील नाही. मी रेल्वे स्टेशनवर झोपू शकतो, असे सांगत परभणी लोकसभा मतदारसंघातून  महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्याकडे असलेली संपत्ती पाहून तुम्हाला त्यांच्या गरिबीचा अंदाज येईल. स्वतःला फकीर म्हणणारे महादेव जानकर हे पाच कोटींपेक्षा जास्त संपत्तीचे मालक असून विविध जिल्ह्यात त्यांच्या शेतजमिनी आहेत. निवडणूक आयोगाकडे जानकर यांनी दाखल केलेल्या शपथपत्रातूनच ही माहिती समोर आली आहे. भाजपवर नाराज होऊन शरद पवारांना भेटून माढा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात असलेले महादेव जानकर पुन्हा महायुतीकडेच गेले आणि महायुतीने त्यांना परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित होते....
MPSC परीक्षांच्या सुधारित तारखांबाबत अनिश्चितताच, लोकसेवा आयोग म्हणतोः एसईबीसी आरक्षण कोट्यामुळे कितीवेळ…
महाराष्ट्र

MPSC परीक्षांच्या सुधारित तारखांबाबत अनिश्चितताच, लोकसेवा आयोग म्हणतोः एसईबीसी आरक्षण कोट्यामुळे कितीवेळ…

 मुंबई: सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश्चिती करून लवकरच परिक्षांच्या  सुधारित तारखा जाहीर करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) कळवले आहे. मात्र मराठा समाजाला देण्यात आलेले एसईबीसी आरक्षण विचारात घेऊन सुधारित मागणीपत्रे कधी मिळतील, याबाबत निश्चितता नसल्याने या परीक्षा नेमक्या कधी घेतल्या जातील? हे सांगता येणार नसल्याचे एमपीएससीने म्हटले आहे. राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता २६ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या आरक्षण अधिनियम २०२४ मधील तरतुदीनुसार, २६ फेब्रुवारी २०२४ पूर्वी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत किंवा जाहिरात प्रसिद्ध होऊन अर्ज मागवण्यात आलेले असून निवड प्रक्रिया सुरु झालेली नाही, अशा प्रकरणी शासनाकडून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण विचारात घेऊन नव्याने आरक्षण निश...
शरद पवार हे आजचे शिवाजी, आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊः पुरूषोत्तम खेडेकरांचे वक्तव्य
महाराष्ट्र, राजकारण

शरद पवार हे आजचे शिवाजी, आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊः पुरूषोत्तम खेडेकरांचे वक्तव्य

पुणेः शरद पवार हे आजचे शिवाजी आहेत. आपण मावळ आहोत. जोपर्यंत आपण दिल्ली ताब्यात घेत नाही, तोपर्यंत आपल्यातली अस्वस्थता थांबणार नाही, असे वक्तव्य मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी केले आहे. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीच्या वतीने ‘अस्वस्थ तरूणाई, आश्वासक साहेब’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून शरद पवारांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. या कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर, कुमार सप्तर्षी, भूषणसिंह होळकर, काँग्रेसचे पुण्यातील उमेदवार रविंद्र धंगेकर, मोहन जोशी, प्रशांत जगताप आदींची उपस्थिती होती. या देशाचा एक इतिहास आहे. जेव्हा जेव्हा देश अडचणीत आला आहे, तेव्हा तेव्हा महाराष्ट्र उभा राहिला आहे. आजचे शिवाजी साहेब झाले आहेत. आपण मावळे होऊन दिल्ली ताब्यात घेऊ तोपर्यंत अस्वस्थता...
शासकीय कला महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांचा प्रतापः बोगस हजेरीपट बनवून विद्यार्थ्यांना मिळवून दिली परीक्षेला बसण्याची परवानगी
महाराष्ट्र

शासकीय कला महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांचा प्रतापः बोगस हजेरीपट बनवून विद्यार्थ्यांना मिळवून दिली परीक्षेला बसण्याची परवानगी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत प्रवेश झालेले नसताना आणि ते विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नियमांनुसार परीक्षेला बसण्यासाठी किमान ७५ टक्के हजेरीची अट पूर्ण करत नसतानाही या महाविद्यालयाच्या अधिष्ठात्याने  बोगस हजेरीपट तयार करून विद्यापीठाचीच दिशाभूल केली आणि त्या विद्यार्थ्यांना नियमित परीक्षेला बसण्याची परवानगी मिळवून दिल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून उघडकीस आला आहे. किलेअर्क परिसरात असलेल्या शासकीय कला व अभिकल्प महाविद्यालयात बी.एफ. ए. आणि एम.एफ.ए. असे दोन अभ्यासक्रम शिकवले जातात. यापैकी बी.एफ.ए. अंतिम वर्षासाठी आरती विजयप्रकाश सिंग आणि अनिकेत विठ्ठल घाटगेकर या दोन विद्यार्थ्यांचे विहित मुदतीत प्रवेशच झाले नव्हते. यो दोन्ही विद्यार्थ्यांचे १ डिसेंबर २०२३ पर्यंत प्रवेशच झालेले न...
लोकसभा निवडणुकीत महिलाच करणार राज्यातील ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण!
महाराष्ट्र, राजकारण

लोकसभा निवडणुकीत महिलाच करणार राज्यातील ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण!

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले असून राज्यात यावेळी ४४० मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत.     ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ३६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. जळगावमध्ये ३३, नाशिक आणि रत्नागिरीमध्ये ३०, मुंबई उपनगरमध्ये २६ महिला नियंत्रित मतदान केंद्र असणार आहेत. तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी प्रत्येकी तीन महिला व्यवस्थापित मतदान केंद्र असतील. या मतदान केंद्रांमध्ये तैनात असलेल्या पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावर असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वजण महिला असतील. लैंगिक समानता आणि मतदान प्रक्रियेत महिलांच्या अधिक रचनात्मक सहभागासंबंधातील वचनबद्धतेचा भाग ...
शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बीडमधून बजरंग सोनवणेंना उमेदवारी,  परभणीत ‘वंचित’कडून पंजाबराव डख मैदानात
महाराष्ट्र, राजकारण

शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून बीडमधून बजरंग सोनवणेंना उमेदवारी,  परभणीत ‘वंचित’कडून पंजाबराव डख मैदानात

मुंबईः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगत चालली आहे. विविध पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. काही ठिकाणी जाहीर केलेले उमेदवार बदलले जात आहेत आणि नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार गटाकडून आज लोकसभेचे दोन उमेदवार जाहीर केले असून बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वंचित बहुजन आघाडीने परभणी लोकसभा मतदारसंघासाठी आधी जाहीर केलेला उमेदवार बदलला असून आता हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांना उमेदवारी दिली आहे. बीड लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचे तिकिट कापून भाजपने त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. बीडमधील महायुतीचा उमेदवार उमेदवार जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडी बीडमधून पंकजा मुंडेंच्या विरोधात कोणाला मैदानात उतरवते याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. महाविकास आघाडीत बीडची जागा ...
राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागात गारपीटीसह वादळी पावसाचा अंदाज
महाराष्ट्र

राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागात गारपीटीसह वादळी पावसाचा अंदाज

मुंबईः राज्यात एकीकडे उन्हाची काहिली वाढत चालली असून अनेक शहरांतील तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. अशातच आता ५ एप्रिलपासून महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे ६ ते ९ एप्रिलदरम्यान राज्यात वादळीवारा आणि गारपिटीसह अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. विदर्भातील ब्रम्हपुरी, मालेगाव, अकोला, मध्य महाराष्ट्रातील जेजुरी आणि सोलापूरसारख्या ठिकाणांचे तापमान ४२ अंश सेल्सिअसरच्या वर गेले आहे. तर राज्यातील बहुतांश शहरांचे तापमान ३९ ते ४० अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. उन्हाच्या तडाख्याने जिवाची लाहीलाही होत असतानाच हवामान विभागाने आता महाराष्ट्रात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. शुक्रवारपासूनच महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि...
भाजपच्या दबावामुळे शिंदेसेनेवर नामुष्कीः हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी मागे, यवतमाळमध्ये भावना गवळी बंडाच्या तयारीत?
महाराष्ट्र, राजकारण

भाजपच्या दबावामुळे शिंदेसेनेवर नामुष्कीः हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी मागे, यवतमाळमध्ये भावना गवळी बंडाच्या तयारीत?

मुंबईः शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार ठरवताना भाजपकडून थेट हस्तक्षेप करण्यात येत असून मतदारसंघातील सर्वेक्षणांचे हवाले देत एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या खासदारांची तिकिटे कापण्याची खेळी भाजपकडून खेळली जात आहे. भाजपच्या दबावापुढे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही हतबल झाले असून हिंगोलीचे विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी मागे घेण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली आहे. तिकडे यवतमाळ-वाशिमच्या विद्यमान खासदार भावना गवळी यांचेही तिकिट कापण्यात आले आहे.  आता हिंगोलीतून हेमंत पाटलांऐवजी बाबुराव कदम कोहळीकर यांना तर यवतमाळ-वाशिममधून हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भावना गवळी आता बंडाच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करून शिवसेनेत उभी फूट पाडल्यानंतर शिंदेसोबत आलेल्या १३ खासदारांची तिकिटे वाचवण...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!