महाराष्ट्र

भाजपला धक्का: जळगावचे खासदार उन्मेश पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन!
महाराष्ट्र, राजकारण

भाजपला धक्का: जळगावचे खासदार उन्मेश पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश, मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या हस्ते बांधले शिवबंधन!

मुंबईः  लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आज भाजपला जय श्रीराम ठोकत आपल्या समर्थकांसह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. आज त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंच्या हस्ते हातावर शिवबंधन बांधून घेतले. उन्मेश पाटलांचा शिवसेना प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उन्मेश पाटील यांचे तिकिट कापले होते. त्यामुळे नाराज होऊन उन्मेश पाटील यांनी भाजपला जय श्रीराम ठोकल्याचे सांगितले जाते, जेथे सन्मान राखला जात नाही, तेथे थांबण्यात काहीच अर्थ नाही, असे उन्मेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर म्हटले आहे. भाजप खासदार उन्मेश पाटील हे आज दुपारी समर्थकांसह मातोश्रीवर पोहोचले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी हाती शिवबंधन बांधून घेतले. यावे...
शिंदे गटाच्या लोकसभा उमेदवार निश्चितीत भाजपचा थेट हस्तक्षेप, ‘पक्ष तुमचा, उमेदवार आमचा’ पॅटर्नमुळे आमदारही धास्तावले!
महाराष्ट्र, राजकारण, विशेष

शिंदे गटाच्या लोकसभा उमेदवार निश्चितीत भाजपचा थेट हस्तक्षेप, ‘पक्ष तुमचा, उमेदवार आमचा’ पॅटर्नमुळे आमदारही धास्तावले!

मुंबईः निवडणुकांसाठी होणाऱ्या आघाडी किंवा युतीमध्ये सहमतीने निर्णय होतो तो जागावाटपाचा. एकदा कोणत्या पक्षाच्या वाट्याला किती जागा हे सूत्र ठरले की त्या त्या पक्षाकडून आपापले उमेदवार निश्चित केले जातात. परंतु भाजपच्या नेतृत्वातील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचा समावेश असलेल्या महायुतीत तसे होताना दिसत नाही. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार निश्चितीत भाजपने थेट हस्तक्षेप सुरू केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपशी झुंज द्यावी लागत आहे. तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत भाजपने अवलंबलेला हा हस्तक्षेपाचा पॅटर्न आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम ठेवला तर आपली खैर नाही, या धास्तीने शिंदे गटातील शिवसेना आमदारांत आतापासूनच चलबिचल सुरू झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलेले उमेदवार बदलण्यासाठी भाजपकडून दबाव आणला जात असल्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटात कमालीची अवस्थता पसर...
‘वंचित’च्या पाच उमेदवारांची घोषणाः नांदेडमध्ये अविनाश भोसीकर, पुण्यातून वसंत मोरे; बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा
महाराष्ट्र, राजकारण

‘वंचित’च्या पाच उमेदवारांची घोषणाः नांदेडमध्ये अविनाश भोसीकर, पुण्यातून वसंत मोरे; बारामतीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा

मुंबईः लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आज पाच उमेदवारांची घोषणा केली. विशेष म्हणजे या उमेदवारांची घोषणा प्रकाश आंबेडकर यांचे टोकाचे राजकीय मतभेद असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) नेते शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांना बारामतीत पाठिंबा जाहीर केला आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात मनसेतून बाहेर पडलेले मराठा नेते वसंत मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर एकेकाळी भारिप-बहुजन महासंघाचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून अविनाश भोसीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भोसीकरांच्या उमेदवारीमुळे भाजपचे उमेदवार आणि विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना जागा वाचवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.  राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बाहेर पडलेले फायरब्रँड नेते वसंत मोरे हे लोकसभेसाठी उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात होते. त्यांनी ...
जळगावात भाजपला धक्काः विद्यमान खासदार उन्मेश पाटील उद्या करणार ठाकरे गटात प्रवेश, नाशिकचे गोडसेही टप्प्यात?
महाराष्ट्र, राजकारण

जळगावात भाजपला धक्काः विद्यमान खासदार उन्मेश पाटील उद्या करणार ठाकरे गटात प्रवेश, नाशिकचे गोडसेही टप्प्यात?

मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच जळगाव जिल्ह्यात भाजपला मोठा दणका बसणार आहे. लोकसभा निवडणुकीचे तिकिट कापल्यामुळे नाराज झालेले विद्यमान भाजप खासदार उन्मेश पाटील हे उद्या बुधवारी दुपारी १२.३० वाजता पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेही ठाकरे गटाच्या टप्प्यात असल्याचे सांगितले जाते. जळगावचे विद्यमान भाजप खासदार उन्मेश पाटील यांनी काही वेळापूर्वीच मुंबईत शिवसेना ठाकरे गटाचे  नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. यंदाच्या निवडणुकीत भाजपने उन्मेश पाटील यांचे तिकिट कापले आहे. त्यांच्याऐवजी स्मिता वाघ यांना जळगावमधून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे नाराज झालेले उन्मेश पाटील उमेदवारी मिळवण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटात जाणार असल्याची चर्चा आधीच सुरू झाली होती. त्यावर आज शिक्का...
हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी बदलणार? खासदार आणि समर्थक धास्तावले, २०० गाड्या भरून शिवसैनिकांची मुंबईकडे धाव!
महाराष्ट्र, राजकारण

हिंगोलीत हेमंत पाटलांची उमेदवारी बदलणार? खासदार आणि समर्थक धास्तावले, २०० गाड्या भरून शिवसैनिकांची मुंबईकडे धाव!

मुंबईः हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी त्यांच्या उमेदवारीला मतदारसंघातील भाजप नेत्यांचा तीव्र विरोध आहे. हिंगोलीतील उमेदवार बदला किंवा ही जागा भाजपकडे घ्या, अशी भूमिका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्यामुळे हेमंत पाटील यांच्या उमेदवारीवर अनिश्चिततेचे सावट घोंगावू लागले आहे. त्यामुळे धास्तावलेल्या हेमंत पाटील समर्थकांनी २०० गाड्या भरून मुंबईच्या दिशेने धाव घेतली असून ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हिंगोलीतून हेमंत पाटलांना उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीपासूनच हा मतदारसंघ भाजपकडे घेण्यासाठी भाजप पदाधिकारी आग्रही होते. परंतु महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या कोट्यात गेली आणि अपेक्षेप्रमाणे हेमंत पाटलांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर होताच हिंगोली लोकसभा...
मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी, राज्यभरात ३३ जणांना फटका; ‘या’ सात जिल्ह्यात पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट
महाराष्ट्र

मराठवाड्यात उष्माघाताचा पहिला बळी, राज्यभरात ३३ जणांना फटका; ‘या’ सात जिल्ह्यात पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट

मुंबईः लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत एकीकडे राज्याचे राजकीय वातावरण तापत चालले असतानाच महाराष्ट्राच्या बहुतांश भागात उष्णतेचाही तडाखा वाढला आहे. वाढत्या तापमानाचा सर्वाधिक फटका विदर्भ आणि मराठवाड्याला बसत असून छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्याच्या पैठण तालुक्यात उष्माघाताने पहिला बळी घेतला आहे तर राज्यात ३३ जणांना उष्माघाताचा फटका बसला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्याच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. काही भागात अवकाळी पाऊस तर काही भागात उन्हाचा तडाखा असे संमिश्र वातावरण राज्यात अनुभवायला मिळत आहे. यंदा मार्च महिन्यात राज्यभरात ३३ जणांना उष्माघाताचा फटका बसला असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राज्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून उष्माघातापासून बचावासाठी काळजी घेण्याबाबतचा कृती आराखडा तयार करण्यात आ...
काँग्रेससोबत ‘वंचित’: बडे नेते सरसावले, काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, समीकरणे बदलणार?
महाराष्ट्र, राजकारण

काँग्रेससोबत ‘वंचित’: बडे नेते सरसावले, काँग्रेसच्या गोटात हालचालींना वेग, समीकरणे बदलणार?

मुंबई: महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील जागावाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचितने दोन उमेदवार याद्या जाहीर केल्यानंतर वंचित बहुजन आघाडी लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचे मानले जात असतानाच काँग्रेसच्या गोटात घडामोडींना वेग आला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी काँग्रेसचे बडे नेते सरसावले असून अकोल्यातील उमेदवार मागे घेऊन प्रकाश आंबेडकरांना पाठिंबा द्यावा, असा सांगावा काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे धाडण्यात आला आहे. या घडामोडींमुळे काँग्रेस-वंचितचे सूत जुळण्याची आणि महाराष्ट्रातील लोकसभेची समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वंचित बहुजन आघाडीचा काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीत समावेश करून घेण्याचे प्रयत्न झाले. परंतु या प्रयत्नांना मुर्तरुप येऊ शकले नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या पहिल्य...
‘वंचित’ची दुसरी यादी जाहीर: हिंगोली, जालना, लातूर, सातारा, सोलापूरसह ११ मतदारसंघात दिले उमेदवार
महाराष्ट्र, राजकारण

‘वंचित’ची दुसरी यादी जाहीर: हिंगोली, जालना, लातूर, सातारा, सोलापूरसह ११ मतदारसंघात दिले उमेदवार

मुंबई: लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीशी चर्चेची दारे बंद केलेली नाहीत, असे प्रकाश आंबेडकरांनी सांगितले असले तरी आज पुन्हा या निवडणुकीसाठी ११ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या दुसऱ्या यादीत हिंगोली, जालना, लातूर, सातारा, सोलापूर, माढा आदी मतदारसंघांचा समावेश आहे. या लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीशी युती करून निवडणुकीला सामोरे जाईल, असे वाटत असतानाच ‘वंचित’ची मविआशी बोलणी फिस्कटली आणि पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपण्याच्या एक दिवसआधी पहिली उमेदवार यादी जाहीर केली होती. वंचितने पहिली यादी जाहीर केल्यानंतरही वंचितच्या महाविकास आघाडीतील समावेशाची शक्यता धुसर झाल्याचे मानले जात होते. परंतु खुद्द वंचित बहु...
छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी, दोन गटाच्या कार्यकर्त्यांची एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण
महाराष्ट्र, राजकारण

छत्रपती संभाजीनगरात मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी, दोन गटाच्या कार्यकर्त्यांची एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेवरून आज छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) आयोजित करण्यात आलेल्या मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी झाली. या बैठकीत उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी आज छत्रपती संभाजीनगरात (औरंगाबाद) जळगाव रोडवरील मराठा मंदिरमध्ये मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या बैठकीत वाद झाला. सुरूवातीला ही बैठक शांततेत सुरू होती. ६० ते ७० जण उपस्थित असलेल्या या बैठकीत अचानक आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन ही बैठक आयोजित करण्यात आल्याचा आरोप काही कार्यकर्त्यांनी केला आणि बैठकीत वादाला तोंड फुटले. टीव्ही९ मराठीने हे वृत्त दिले आहे. बैठकीत वादाला तोंड फुटल्यानंतर...
शेकापच्या झुंजार आणि अभ्यासू ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे निधन, आक्रमक कोकणकन्या काळाच्या पडद्याआड
महाराष्ट्र

शेकापच्या झुंजार आणि अभ्यासू ज्येष्ठ नेत्या मीनाक्षी पाटील यांचे निधन, आक्रमक कोकणकन्या काळाच्या पडद्याआड

अलिबागः शेतकरी कामगार पक्ष म्हणजेच शेकापच्या आक्रमक आणि अभ्यासू ज्येष्ठ नेत्या, माजी आमदार मीनाक्षी पाटील यांचे आज निधन झाले. त्यांच्यावर आज दुपारी दोन वाजता पेझारी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या त्या तीनवेळा आमदार होत्या. विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांनी राज्य मंत्री म्हणूनही काम केले होते. एक अभ्यासू आणि आक्रमक नेत्या अशी मीनाक्षी पाटलांची ओळख होती. शेकापच्या वतीने आरसीएफ, रेवस मांडवा विमानतळ, महासेझ, आयपीएल आदी प्रकल्पांच्या विरोधात आंदोलने करून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. शेकापचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील यांच्या त्या भगिनी तर शेकाप नेते आस्वाद पाटील यांच्या त्या मातोश्री होत. मीनाक्षी पाटील १९९२ मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या विरोधी पक्षनेत्या होत्या. १९९५ च्या विधानसभ...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!