राजकारण

‘प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते’ म्हणत सख्ख्या भावानेच सोडली अजित पवारांची साथ, म्हणालेः याच्यासारखा नालायक…
महाराष्ट्र, राजकारण

‘प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते’ म्हणत सख्ख्या भावानेच सोडली अजित पवारांची साथ, म्हणालेः याच्यासारखा नालायक…

बारामतीः ‘आपण औषध विकत घेतो त्याला एक्स्पायरी डेट असते. तशीच नात्यांचीही एक्स्पायरी डेट असते,’ असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सख्खे मोठेबंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे ऐननिवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांना हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार यांनी जुलै २०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडून भाजप-एकनाथ शिंदेंच्या शिवसेना सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये  शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट तयार झाले. या फुटीमुळे लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघात शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार असा नंणद-भावजयीचा संघर्ष रंगण्याची चिन्हे आहेत. अशातच अजित पवारांचे सख्खे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांनीच काकांनी काहीही दिले नाही, असे म्हणणे चुकीचे आहे. आत्तापर्यंत अजि...
अकोला, नांदेड, संभाजीनगर, हिंगोली आणि अमरावतीची जागा ‘वंचित’ला? महाविकास आघाडीचा संभाव्य जागावाटप फॉर्म्युला
महाराष्ट्र, राजकारण

अकोला, नांदेड, संभाजीनगर, हिंगोली आणि अमरावतीची जागा ‘वंचित’ला? महाविकास आघाडीचा संभाव्य जागावाटप फॉर्म्युला

मुंबईः लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या असल्या तरी महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. परंतु आघाडीची जागावाटपाची बोलणी पूर्ण झाली असून उद्धव ठाकरेंची शिवसेना २२, काँग्रेस १६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी १० जागा लढणार असल्याचा संभाव्य फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. आघाडीच्या या जागावाटपात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीला चार ते पाच जागा सोडण्याचेही निश्चित झाले असून त्यात अकोला, नांदेड, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), हिंगोली आणि अमरावतीचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच भाजपने महाराष्ट्रातील २० जागांची यादी जाहीर करून टाकली आहे. महायुतीचे जागावाटप निश्चित होण्याआधीच ही यादी जाहीर केल्यामुळे भाजपवर टिकाही करण्यात आली. महायुतीतील २८ जागांच्या वाटपावर चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे महा...
लोकसभा निवडणुकांची घोषणाः देशात ७ टप्प्यात होणार मतदान, ४ जूनला निकाल; वाचा तुमच्या जिल्ह्यात कधी होणार मतदान?
देश, राजकारण

लोकसभा निवडणुकांची घोषणाः देशात ७ टप्प्यात होणार मतदान, ४ जूनला निकाल; वाचा तुमच्या जिल्ह्यात कधी होणार मतदान?

नवी दिल्लीः  भारत निवडणूक आयोगाने लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा आज केली.  देशात टप्प्यात मतदान होणार असून एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासून जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मतदान होऊन ४ जून रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. या निवडणुकीबरोबरच चार राज्यांतील २६ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकाही होणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि नवनिर्वाचित निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीरसिंग संधू यांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. १९ एप्रिलला पहिला टप्पा, २६ एप्रिलला दुसरा टप्पा, ७ मे रोजी तिसरा टप्पा, १३ मे रोजी चौथा टप्पा, २० मे रोजी पाचवा टप्पा, २५ मे रोजी सहावा टप्पा आणि १ जून रोजी सातव्या टप्प्यात मतदान होईल. निवडणुका जाहीर होताच संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. निवडणुकीतील गैरप्रकार टाळण्यासाठी...
‘घड्याळ’ चिन्हही वापरू नका, दुसरे निवडणूक चिन्ह वापरा आणि तणावविरहित काम कराः सुप्रीम कोर्टाची अजित पवार गटाला सूचना
देश, राजकारण

‘घड्याळ’ चिन्हही वापरू नका, दुसरे निवडणूक चिन्ह वापरा आणि तणावविरहित काम कराः सुप्रीम कोर्टाची अजित पवार गटाला सूचना

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह अजित पवार गटाला देण्याच्या निर्णयाला शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून या याचिकेवर आज झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाच्या वकिलाची चांगलीच कानउघाडणी केली. तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात. मग प्रचाराच्या साहित्यावर शरद पवारांचा फोटो का वापरता?  असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला. त्याचबरोबर ‘घड्याळ’ हे चिन्हही न वापरण्याची सूचना अजित पवार गटाला केली आहे. दुसरे निवडणूक चिन्ह वापरा आणि कोणत्याही तणावाशिवाय शांततेने काम करा, असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज शरद पवार गटाकडून युक्तिवाद केला. सुनावणीदरम्यान त्यांनी प्रचार साहित्यावर अजित पवार गटाकडून शरद पवारांचा फोटो वापरला जात असल्याची तक्रार केली. अजित पवार गट शरद पवार यांच्या फोटोचा, नावाचा चुकीच्य...
लोकसभेसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर, वाचा कोणाला उमेदवारी आणि कोणाचा पत्ता कट?
देश, राजकारण

लोकसभेसाठी भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांची नावे जाहीर, वाचा कोणाला उमेदवारी आणि कोणाचा पत्ता कट?

नवी दिल्लीः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवार यादी आज जाहीर केली आहे. या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांसह देशभरातील ७२ उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महायुतीच्या जागावाटपाचे सूत्र निश्चित होण्याआधीच भाजपने महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीत नागपूरमधून नितीन गडकरी, जालन्यातून रावसाहेब दानवे, बीडमधून पंकजा मुंडे, नांदेडमधून प्रताप पाटील चिखलीकर, पुण्यातून मुरलीधर मोहोळ तर भिवंडीतून कपील पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मोठा राजकीय वनवास भोगलेल्या पंकजा मुंडेंना भाजपने बीडमधून उमेदवारी दिली आहे. भाजपने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या यादीत दिग्गजांच्या नावांचा समावेश आहे. ही यादी जाहीर करताना भाजपने अनेक बड्या चेहऱ्यांचा तिकिटे कापली ...
अहमदनगरचे नाव आता ‘अहिल्यानगर’, तर पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड: राज्य सरकारचा निर्णय
महाराष्ट्र, राजकारण

अहमदनगरचे नाव आता ‘अहिल्यानगर’, तर पुण्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड: राज्य सरकारचा निर्णय

मुंबई: अहमदनगर शहराचे नाव बदलून अहिल्यानगर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचेही नाव बदलणात आले असून या तालुक्याला राजगड नाव देण्यात आले आहे.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. सह्याद्री अतिथी गृहावर झालेल्या या बैठकीला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.  या मंत्रिमंडळ बैठकीत अन्य काही निर्णय घेण्यात आले आहेत.ते असे- १. मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी अद्ययावत मराठी भाषा धोरण जाहीर. २. पोलीस पाटलांच्या मानधनात भरीव वाढ. आता मिळणार महिन्याला १५ हजार रुपये मानधन. ३. राष्ट्रीय आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत घेणार. हजारो कर्मचाऱ्यांना लाभ. ४. आशा स्वयंसेविका मानधनात भरीव पाच हजार रुपये वाढ. ५. शुभ...
महायुतीकडून लढण्याचे स्वप्न भंगले, शांतिगीरी महाराज आता महाविकास आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार?
महाराष्ट्र, राजकारण

महायुतीकडून लढण्याचे स्वप्न भंगले, शांतिगीरी महाराज आता महाविकास आघाडीच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार?

नाशिकः छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वेरूळ मठाचे मठाधिपती शांतिगीर महाराज हे यंदा नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरणात आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे शांतिगिरी महाराजांचे भाजपच्या नेतृत्वातील महायुतीच्या तिकिटावर ही निवडणूक लढवण्याचे स्वप्न भंगल्यानंतर आता ते महाविकास आघाडीकडून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याची बातमी समोर येत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शांतिगिरी महाराज यांनी घोषणा केली आहे. भाजपच्या नेतृत्वातील महायुतीकडून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी जोरदार प्रयत्न केले. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. शांतिगिरी महाराजांच्या उमेदवारीसाठी भाजपमधील काही नेतेही आग्रही होते. शांतिगिरी महाराजांनी मुख्य...
छत्रपती संभाजीनगरला राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय, प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक कक्ष
महाराष्ट्र, राजकारण

छत्रपती संभाजीनगरला राज्याचे अल्पसंख्याक आयुक्तालय, प्रत्येक जिल्ह्यात अल्पसंख्याक कक्ष

मुंबई: राज्यात छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्यास तसेच जिल्हास्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. अल्पसंख्याक विकास विभागाच्या अधिपत्याखाली हे आयुक्तालय असेल. तसेच त्या-त्या जिल्ह्यात जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अल्पसंख्याक कक्ष निर्माण करण्यात येईल.  या अल्पसंख्याक आयुक्तालय कार्यालयासाठी एकूण ३६ पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली. प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली अल्पसंख्याक कक्ष निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली.  प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन अधिकारी हे जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी म्हणून काम पाहतील. राज्यातील ३६ जिल्ह्यातील अल्पसंख्याक कक्षाकरिता ए...
‘वंचित’कडून सुजात आंबेडकर अमरावतीतून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात?, स्थानिक पदाधिकारी आग्रही आणि जय्यत तयारीही!
महाराष्ट्र, राजकारण

‘वंचित’कडून सुजात आंबेडकर अमरावतीतून लोकसभा निवडणुकीच्या मैदानात?, स्थानिक पदाधिकारी आग्रही आणि जय्यत तयारीही!

अमरावतीः आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीची महाविकास आघाडीसोबत जागावाटपाबाबत चर्चा सुरू असतानाच अमरावती लोकसभा मतदारसंघातून प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र आणि वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर हे निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे. सुजात आंबेडकर यांनी अमरावतीमधून लोकसभा लढवावी, असा ठरावच ‘वंचित’च्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला असून त्या दृष्टीने जय्यत तयारीही सुरू केली आहे. त्यामुळे अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांचे धाबे दणाणले आहे. सर्वच राजकीय पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत अद्यापही स्पष्ट बोलणी झालेली नाही आणि जागावाटपाचा फॉर्म्युलाही जाहीर झालेला नाही. अशातच राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा लढवण्याची वंचित बहुजन आघाडीची तयारी असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी ...
लोकसभेसाठी बीडमधून प्रीतम मुंडेंची उमेदवारी नक्की नाही, भाजप नेते रावसाहेब दानवेंचा बॉम्बगोळा; पुन्हा डॉ. कराडच आड?
महाराष्ट्र, राजकारण

लोकसभेसाठी बीडमधून प्रीतम मुंडेंची उमेदवारी नक्की नाही, भाजप नेते रावसाहेब दानवेंचा बॉम्बगोळा; पुन्हा डॉ. कराडच आड?

मुंबईः मागच्या निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा परळी विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर आज ना उद्या त्यांचे राजकीय पुनर्वसन होईल म्हणत म्हणतच विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. अशातच आता बीड लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदार आणि पंकजा मुंडे यांच्या भगिनी प्रीतम मुंडे यांची आगामी लोकसभा निवडणुकीत पत्ता कट होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. प्रीतम मुंडे यांची बीडमधून उमेदवारी नक्की नसल्याचा  बॉम्बगोळा भाजप नेते आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी टाकला आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रावसाहेब दानवे हे गुरुवारी बीडच्या दौऱ्यावर होते. बीड लोकसभा मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व मानले जाते. महायुतीमध्ये बीडच्या जागा भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. बीडमधून भाजपचा उमेदवार कोण? असे दानवे यांना विचारले असता खासदार प्रीतम मुंडे, डॉ. भागवत कराड आणि माझी उमेद...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!