दुनिया

ऑस्कर पुरस्कार २०२४: ‘ओपन हायमर’चा डंका, सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता; एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
दुनिया

ऑस्कर पुरस्कार २०२४: ‘ओपन हायमर’चा डंका, सिलियन मर्फी सर्वोत्कृष्ट अभिनेता; एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

लॉस एंजेलिसः जगभरातील चित्रपटप्रेमी आतुरतेने वाट पहात असलेला ऑस्कर २०२४ सोहळा दिमाखात पार पडला असून ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. ९६ व्या अकादमी पुरस्कार सोहळ्यात ओपनहायमरने डंका गाजवला असून या चित्रपटाला सात ऑस्कर जाहीर झाले आहेत. सिलियन मर्फी हा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला तर एमा स्टोनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा ऑस्कर जाहीर झाला आहे. ख्रिस्तोफर नोलन दिग्दर्शित ओपनहायमर हा सर्वोत्कृष्ट सिनेमा ठरला आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराबरोबरच सात ऑस्कर जिंकले आहेत. ख्रिस्तोफर नोलनला याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठीत ऑस्कर मिळाला आहे. याच चित्रपटातील अभिनयासाठी सिलियन मर्फीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला आहे. ओपन हायमरने सर्वोत्कृष्ट ओरिजन स्कोअरचाही पुरस्कार जिंकला आहे. याच चित्रपाटने सर्वोत्कृष्ट सिनेमाटोग्राफी, सर्वोत्...
चंद्रपुरात ६५ हजार ७२४ रोपट्यांपासून साकारला ‘भारतमाता’ शब्द, वन विभागाच्या उपक्रमाची गिनिज बुकात नोंद
दुनिया, महाराष्ट्र

चंद्रपुरात ६५ हजार ७२४ रोपट्यांपासून साकारला ‘भारतमाता’ शब्द, वन विभागाच्या उपक्रमाची गिनिज बुकात नोंद

मुंबई: वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून वन विभागाने  ६५  हजार ७२४ रोपट्यांपासून ‘भारतमाता’ या शब्दाची निर्मिती करून वनविभागाने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले. यामुळे वन विभागाने आपल्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. आतापर्यंत वनविभागाने चार ‘लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’  नावावर करण्याचाही विक्रम केला आहे. चंद्रपूर येथे वनविभागाच्यावतीने १ ते ३ मार्च या कालावधीत ‘ताडोबा महोत्सव २०२४’ आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवांतर्गत वेगवेगळ्या प्रजातींच्या रोपट्यांपासून ‘भारतमाता’ हा शब्द लिहून वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा संकल्प वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला होता. हा संकल्प शनिवारी (२ मार्च) चंद्रपुरातील रामबाग येथे प्रत्यक्षात साकारण्यात आला. २६ प्रजातींच्या तब्बल ६५  हजार ७२४ रोपट्यांनी ‘भारतमाता’ य...
टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला, क्रिकेटपटू शोएब मलिकने केले सना जावेदशी तिसरे लग्न!
दुनिया, देश

टेनिसपटू सानिया मिर्झाचा संसार मोडला, क्रिकेटपटू शोएब मलिकने केले सना जावेदशी तिसरे लग्न!

इस्लामाबादः भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी तिसरे लग्न केले आहे. त्याने तिसऱ्या लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. मागील अनेक दिवसांपासून सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. सानिया मिर्झाने बुधवारीच एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामुळे तिच्या आणि शोएब मलिकच्या घटस्फोटांच्या अफवा अधिक वेगाने पसरू लागल्या होत्या. शोएब आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या येत असतानाच आज शोएब मलिकने तिसऱ्या लग्न सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. एका समारंभात शोएब आणि सना यांचा निकाह झाल्याचे पाकिस्तानी माध्यमांनी म्हटले आहे. शोएबचे पहिले लग्न आयेशा सिद्दीकीशी, दुसरे लग्न सानिया मिर्झाशी तर तिसरे लग्न सना जावेदशी झाले आहे. शोएब आणि सना जावेद ...
छत्रपती संभाजीनगरात फेब्रुवारीमध्ये तीन दिवस वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन, ‘या’ तारखा ठेवा राखून!
दुनिया, देश

छत्रपती संभाजीनगरात फेब्रुवारीमध्ये तीन दिवस वेरूळ-अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन, ‘या’ तारखा ठेवा राखून!

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):  जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आयोजित केला जाणारा वेरुळ-अजिंठा महोत्सव यंदा २, ३ व ४ फेब्रुवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरातील सोनेरी महल येथे होत आहे. या महोत्सवात जिल्हावासियांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा महोत्सव आयोजन समितीचे अध्यक्ष आस्तिककुमार पाण्डेय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केले. पत्रकार परिषदेस राज्य आयुक्त, लोकसेवा हक्क आयोग, पुणे दिलीप शिंदे, महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया,  राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक संतोष झगडे आदी उपस्थित होते. पर्यटन विभागाचे विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पर्यटन वाढीसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महा...
बैजू पाटील यांच्या ‘बेबी बॅग’ छायाचित्रास जागतिक मोनोक्रोम फोटोग्राफी स्पर्धेत तृतीय पुरस्कार
दुनिया, देश

बैजू पाटील यांच्या ‘बेबी बॅग’ छायाचित्रास जागतिक मोनोक्रोम फोटोग्राफी स्पर्धेत तृतीय पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): इटलीमध्ये झालेल्या वर्ल्ड मोनोक्रोम फोटोग्राफी अवॉर्ड स्पर्धेत छत्रपती संभाजीनगरचे (औरंगाबाद) वन्यजीव छायाचित्रकार बैजू पाटील यांच्या बेबी बॅग या छायाचित्राने जागतिकस्तरावर तिसरा क्रमांक पटकावला आहे. ही स्पर्धा ब्लॅक अँड व्हाईट श्रेणीत घेण्यात आली. व्यावसायिक वन्यजीव श्रेणीत बैजू पाटील यांच्या बेबी बॅग छायाचित्राने तिसरा क्रमांक पटकावला आहे. जागतिकस्तरावर अतिशय नवाजलेली ही स्पर्धा आहे. या स्पर्धेमध्ये जगातील २१ देशांनी भाग घेतला होता. ६५ हजार छायाचित्र या स्पर्धेमध्ये आले होते. बैजू पाटील यांना पहिल्यांदाच हा पुरस्कार भेटलेला आहे. बैजू पाटील यांनी हा फोटो कर्नाटकमध्ये दारोजी नॅशनल पार्क येथे काढलेला आहे. हे अस्वल आहे आणि अस्वलाच्या पाठीवर दोन पिल्लं घेऊन ती आई जंगलामध्ये भटकंती करत असतानाचे व तेथे काही कावळे अस्वलाला टोचा मारून तिथून त्याला पळवण्याच्...
२७ ते २९ जानेवारीदम्यान नवी मुंबईतील वाशी येथे विश्व मराठी संमेलन
दुनिया, महाराष्ट्र

२७ ते २९ जानेवारीदम्यान नवी मुंबईतील वाशी येथे विश्व मराठी संमेलन

मुंबई: नवी मुंबईतील वाशी येथे येत्या २७ ते २९ जानेवारी या कालावधीत ‘विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून ‘मराठी भाषेची वैश्विक व्याप्ती’ ही या विश्व संमेलनाची मध्यवर्ती संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. या संमेलनात मराठमोळ्या दर्जेदार कार्यक्रमांची रेलचेल असेल, अशी माहिती मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. आज विश्व मराठी संमेलनाच्या आयोजनाचा मंत्रालयात झालेल्या बैठकीत केसरकर यांनी आढावा घेतला. यावेळी मराठी भाषा विभागाचे उपसचिव हर्षवर्धन जाधव, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ.श्यामकांत देवरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. संमेलनाच्या आयोजनाची जबाबदारी राज्य मराठी विकास संस्थेला देण्यात आली आहे. जानेवारी २०२३ मधील विश्व मराठी संमेलनाला मराठी भाषकांकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. हा प्रतिसाद पाहून यावर्षी देखील विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात ये...
भारतीय सिनेमाचे भवितव्य सामान्य नागरिक ठरवतील: पद्मभूषण जावेद अख्तर, ९ वा अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू
दुनिया, देश

भारतीय सिनेमाचे भवितव्य सामान्य नागरिक ठरवतील: पद्मभूषण जावेद अख्तर, ९ वा अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद): आर.बाल्की आणि अनुभव सिन्हा यांच्यासह आणखी काही बोटांवर मोजण्या इतके दिग्दर्शक ज्यांनी संवेदनशीलता जपत समाजाला संदेश देणारे चित्रपट बनवले आहेत. या प्रकारचे चित्रपट बनवणाऱ्या दिग्दर्शकांसमवेत प्रेक्षक किती काळ आणि कधीपर्यंत सोबत असतील यावर भारतीय सिनेमाचे भवितव्य ठरेल, असे प्रतिपादन गीतकार पद्मभूषण जावेद अख्तर यांनी यावेळी केले. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा-वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन बुधवारी एमजीएम विद्यापीठाच्या रूक्मीणी सभागृहात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या उपस्थितीत झाले. यावेळी गीतकार जावेद अख्तर यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या महोत्सवाचे उद्घाटन प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक आर.बाल्की आणि दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी एनएफडी...
‘या’ सोप्या उपायांनी उतरवा थर्टी फर्स्ट, न्यू ईयर पार्टीचा हँगओव्हर!
दुनिया, देश

‘या’ सोप्या उपायांनी उतरवा थर्टी फर्स्ट, न्यू ईयर पार्टीचा हँगओव्हर!

मुंबईः सध्या सगळीकडे मावळत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी थर्टी फर्स्ट आणि न्यू ईयर सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्ट्यांमध्ये अनेक जण अल्कोहोलचे सेवन करतात. परंतु अनेकांना अल्कोहोलचे जास्त सेवन केल्यामुळे हँगओव्हरचा त्रास होतो. अशावेळी काही घरगुती उपायांनी हा हँगओव्हर उतरवण्यास तुम्हाला मदत होऊ शकते. भरपूर पाणी प्या अल्कोहोलच्या सेवनामुळे लोक अधिक प्रमाणात लघवी करतात. त्यामुळे शरीरातील द्रवपदार्थ कमी होतात. शरीरातील हे गमावलेले द्रवपदार्थ पुन्हा मिळवण्यासाठी भरपूर पाणी प्या. म्हणजे हँगओव्हरचा त्रास कमी होईल. टोस्ट खा टोस्टसारख्या कार्बोहायड्रेटचे सेवन केल्यामुळे हँगओव्हरची लक्षणे कमी होण्यास मदत होते. हे कार्बोहायड्रेट्स रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. त्यामुळे हँगओव्हर उतरण्यास मदत होते. पुरेसा आराम हँगओव्हरवर मात...
तुमच्यात आहे का कौशल्य पणाला लावण्याची धमक? मग तुम्हाला खुणावतेय जागतिक कौशल्य स्पर्धा, वाचा सविस्तर तपशील…
दुनिया, देश

तुमच्यात आहे का कौशल्य पणाला लावण्याची धमक? मग तुम्हाला खुणावतेय जागतिक कौशल्य स्पर्धा, वाचा सविस्तर तपशील…

मुंबई: जागतिक कौशल्य स्पर्धा २०२४ ही फ्रांस (ल्योन) येथे होणार असून देशातील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी जिल्हा, विभाग, राज्य आणि देशपातळीवर कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी २३ वर्षाखालील युवकांनी ७ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त र.प्र सुरवसे यांनी केले आहे. जागतिक कौशल्य स्पर्धा ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक शिक्षण आणि कौशल्य उत्कृष्टता स्पर्धा आहे. दर दोन वर्षांनी या स्पर्धेचे आयोजन केले जाते. ही स्पर्धा जगभरातील २३ वर्षांखालील तरुणांकरिता त्यांच्यातील कौशल्य सादर करण्याची ऑलिम्पिक खेळासारखीच स्पर्धा आहे.  यापूर्वी ४६व्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये ६२ विभागातून ५० देशातील १० हजार उमेदवार समाविष्ट झाले होते. स्पर्धेचे आयोजन जिल्हा, विभाग, राज्य आणि देश पातळीवर करण्यात येणार असून ...
ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार: मार्गारेट गार्डनर यांची माहिती
दुनिया

ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे लवकरच भारतात कॅम्पस सुरु करणार: मार्गारेट गार्डनर यांची माहिती

मुंबई: भारतातून ऑस्ट्रेलियात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी मेलबर्न राजधानी असलेल्या व्हिक्टोरिया राज्यात येतात. आता ऑस्ट्रेलियातील विद्यापीठे देखील लवकरच भारतात आपले कॅम्पस सुरु करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्याच्या गव्हर्नर प्रो. मार्गारेट गार्डनर यांनी दिली. गव्हर्नर प्रो. मार्गारेट गार्डनर यांनी व्हिक्टोरिया राज्याच्या एका शिष्टमंडळासह गुरुवारी (६ डिसेंबर) महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरिया राज्यात भारतीय लोकांची संख्या मोठी असून ते तेथील नागरी सेवा, संस्कृती व उद्योग क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देत असल्याचे गार्डनर यांनी सांगितले. मेलबर्न येथे महाराष्ट्रातील लोकांची सांस्कृतिक संघटना असून मुंबई-मेलबर्न थेट विमानसेवेमुळे महाराष्ट्र व व्ह...
error: कॉपी नको, लिंक शेअर करा!