कोरोनालाही हरवता येतय…!

0
16
प्रतिकात्मक छायाचित्र.

माझ्या मते कोरोनाला योग्य ती काळजी घेऊन पूर्णपणे हरवता येते. मी एकांतवासाचा सुयोग्य वापर केला होता. रूममध्येच व्यायाम केला. सकारात्मक विचारांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासाठी चौरस आहारही घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी घरीच थांबा व सुरक्षित रहा, एवढेच माझे सांगणे आहे!

  • नागपुरातील कोरोनाबाधिताचा स्वानुभव

माहिती तंत्रज्ञान उद्योगात नोकरीला असल्यामुळे एका राष्ट्रीय परिषदेसाठी आम्ही ८ सहकारी अमेरिकेला गेलो होतो. कोरोना विषाणू संदर्भात भारतात (नागपुरात) परतल्यावर त्यापैकी ३ सहकाऱ्यांची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली. हे ऐकून मी घरीच स्वत:ला क्वारंटाईन केलं आणि नंतर माझ्यासेाबत आलेल्या मित्रांसोबत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी गेलो. मला असिम्टोटिक कोरोना झाल्याचे निदान झाले. म्हणजे कोरोनाची कोणतीही बाह्य लक्षणे मला नव्हती. तरी मला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले. कोरोना असल्याचे कळले. त्यामध्ये मला मल्टिविटामिनच्या गोळ्या रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी देण्यात आल्या. कोरोना ट्रिटमेंटच्या प्रोटोकॉलनुसार सुरूवातीला मला आयोसलेशन वार्डमध्ये ठेवण्यात आले. खरे म्हणजे सुरूवातीला थोडे टेन्शन आले होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध असल्याचे पाहून मला बरे वाटले.

मला आयसोलेशन करण्यात आलेल्या वार्डमध्ये मी स्वत:साठी टाईमटेबल बनवला. त्यात मी वाचन, रुममध्येच वॉक, यू-टयूबवरील सकारात्मक व्हिडिओचा समावेश होता. या काळात मी कटाक्षाने कोरोनासंबंधित नकारात्मक बातम्या किंवा अन्य साहित्य वाचले नाही. कोरोनाचा मृत्यूदर कमी असल्याचे मी वाचले. त्यामुळे मला हॉस्पिटलमार्फत देण्यात येणाऱ्या प्रतिबंधात्मक सूचनांचे मी काटेकोरपणे पालन केले. माझ्या आजारादरम्यान मला जिल्हा प्रशासनातर्फे पूर्ण सहकार्य करण्यात आले.

आयसोलेशनदरम्यान माझ्यापर्यत कोणी येत नव्हते. साधारण ७ व्या दिवशी माझ्या घशातील स्त्रावाच्या नमुन्याची तपासणी करण्यात आली. ती निगेटिव्ह आला. डिस्चार्जनंतरही मला घरी मास्क घालून व घरातील सदस्यापासून दूर राहण्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच यादरम्यान खोकला किंवा सर्दी वाटल्यास तात्काळ  दवाखान्यात येण्याच्याही सूचना दिल्यात. माझ्या मते कोरोनाला योग्य ती काळजी घेऊन पूर्णपणे हरवता येते. मी एकांतवासाचा सुयोग्य वापर केला होता. रूममध्येच व्यायाम केला. सकारात्मक विचारांनी आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यासाठी चौरस आहारही घेणे आवश्यक आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी घरीच थांबा व सुरक्षित रहा, एवढेच माझे सांगणे आहे!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा