मराठवाडा पदवीधर मतदारसंघात ३९ जणांचे उमेदवारी अर्ज, सर्वाधिक बंडखोरी भाजपमध्ये!

0
95
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी काल, तब्बल ३९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. उमेदवारी दाखल करणाऱ्या एकूण उमेदवारांची संख्या ६५ वर पोहोचली आहे. या उमेदवारी अर्जांची आज छानणी केली जाणार असून १७ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.

या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होणार आहे. महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण हे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर भाजपने शिरीष बोराळकरांना मैदानात उतरवले आहे. भाजपच्या वतीने औरंगाबादेतून प्रवीण घुगे, लातूर जिल्ह्यातील विवेकानंद उजळंबकर यांनी तर भाजपचेच रमेश पोकळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपमध्ये झालेली ही बंडखोरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत कायम राहते की हे उमेदवार अर्ज मागे घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाविकास आघाडीमध्येही बंडखोरी झाली असून हिंगोलीचे दिलीप घुगे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सर्वात विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचे भाऊ प्रदीप भानुदास चव्हाण यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. प्रदीप चव्हाण यांचा उमेदवारी अर्ज डमी आहे की कसे, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.

हेही वाचाः शिरीष बोराळकरांसाठी एकाचे तिकिट कापलेः पंकजा मुंडेंचा नेमका कुणावर निशाणा?

नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्यांची नावे: छाया सोनवणे (इंडियन नॅशनल मानवाधिकार पाटी) पडेगाव (छावणी) औरंगाबाद, शेख गुलामरसुल कठ्ठु (अपक्ष), औरंगाबाद, ॲड .(डॉ) यशवंत रामभाऊ कसवे (अपक्ष) परभणी, ॲड.प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील कोळीकर उर्फ के.सागर (अपक्ष), मु.पो.कोळी, (जनसूर्या निवास) ता. हदगाव, जि.नांदेड, काजी तसलीम निजामोद्दीन (अपक्ष) उस्मानाबाद, शेख हाज्जू हुसेन पटेल (अपक्ष) मु.जामगाव, पो.रघुनाथ नगर, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद, ढवळे सचिन राजाराम (अपक्ष) औरंगाबाद, डॉ. रोहित शिवराम बोरकर (आम आदमी पाटी) पुणे, रमेश साहेबराव कदम (अपक्ष) मु.पो.सिंगारवाडी ता.किनवट, जि.नांदेड, संदिप बाबुराव कराळे (अपक्ष) मु.पो. कमटाळा, ता.किनवट, जि.नांदेड, सुनिल तुळशीराम माहांकुडे (अपक्ष) अशोक नगर, बार्शी नाका, बीड, संजय शहाजी गंभीरे (अपक्ष) अंबाजोगाई, कृष्णा दादाराव डोईफोडे (अपक्ष) मु.पो.अंतरवाली (खांडी), ता.पैठण, जि.औरंगाबाद, शे .सलीम शे. इब्राहिम (वंचित समाज इन्साफ पार्टी), परभणी, विजेंद्र राधाकिसन सुरासे (अपक्ष), जालना, सचिन अशोक निकम (रिपब्लिकन सेना) औरंगाबाद, उत्तम बाबुराव बनसोडे (पीपल्स रिपब्लिकन पार्टी) मुखेड जि.नांदेड, विशाल उध्दव नांदरकर (अपक्ष), औरंगाबाद, प्रा. नागोराव काशीनाथ पांचाळ (वंचित बहुजन आघाडी), मु.पो.कातनेश्वर ता.पूर्णा, जि.परभणी, राम गंगाराम आत्राम (अपक्ष) लातूर, अशोक विठ्ठल सोनवणे (अपक्ष), मु.पो.अंभई ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद, अक्षय नवनाथराव खेडकर (अपक्ष) औरंगाबाद, समदानी चाँदसाब शेख (अपक्ष), तरोडा (बु) नांदेड, वसंत संभाजी भालेराव (प्रबुध्द रिपब्लिकन पार्टी),  औरंगाबाद, अब्दुल रऊफ (समाजवादी पार्टी) औरंगाबाद, कुणाल गौतम खरात (एमआयएम) औरंगाबाद, अंभोरे शंकर भगवान (अपक्ष), औरंगाबाद, विजयश्री भागीनाथ बारगळ (अपक्ष) औरंगाबाद, ॲड .शिरिष मिलिंद कांबळे (बहुजनमुक्ती पार्टी) मोरेवाडी, पो.चनई, ता. अंबाजोगाई, जि.बीड, ॲड .बळीराम लक्ष्मणराव केंद्रे (अपक्ष), मु.कुमठा (खुर्द), ता.उदगीर, जि.लातूर, ॲड .शेख फेरोजमिया खालेद (अपक्ष), बीड, विलास बन्सीधर तांगडे, (अपक्ष), मु.पो.जांबसमर्थ, ता.घनसावंगी, जि .जालना.

यापैकी सतीश चव्हाण यांनी ०३, शिरीष बोराळकर यांनी २, शे .सलीम शे. इब्राहिम २, सचिन अशोक निकम २, उत्तम बाबुराव बनसोडे २, प्रा .नागोराव काशीनाथ पांचाळ २, दिलीप हरिभाऊ घुगे २, अब्दुल रऊफ २, विजेंद्र राधाकिसन सुरासे२, विवेकानंद शशिकांत उजळंबकर २ तर विलास बन्सीधर तांगडे यांनी ४ उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याची माहिती उपआयुक्त तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळवली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा