कोरोनाग्रस्त ब्रिटनमधील पर्यटकांचा डेक्कन ओडिशीने प्रवास, औरंगाबादेत झाले जंगी स्वागत

0
188

औरंगाबादः डेक्कन ओडिशी या शाही रेल्वेचे शुक्रवारी दुपारी औरंगाबादेत आगमन झाले. या शाही रेल्वेने ब्रिटनचे तब्बल ६० पर्यटक औरंगाबादेत आले आहेत. औरंगाबाद रेल्वे स्थानकावर ते उतरल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यापैकी एकाही पर्यटकाने मास्क घातलेला नव्हता. जगभरात कोरोनाचा फैलावर झाला आहे. ब्रिटनमध्ये तर तेथील आरोग्यमंत्री नदीन डॉरिस यांनाच कोरोनाची लागण झालेली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे आरोग्यही धोक्यात आहे. कारण कोरोनाबाधित आरोग्यमंत्री नदीन त्यांच्या भेटीला गेल्या होत्या. ब्रिटनमध्ये ३५० जणांना कोरोनाची लागण झाली असून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. अशा स्थितीत ब्रिटनच्या पर्यटकांचा डेक्कन ओडिशीने प्रवास महाराष्ट्राच्या चिंतेत भर घालणार आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने जगातील सर्व देशातील नागरिकांचा व्हिसा निलंबित करून जगासाठी भारताची दारे बंद केलेली आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा