उस्मानाबाद येथील साहित्य संमेलनाचे रानकवी ना. धो. महानोर यांच्या हस्ते होणार उद्घाटन

0
177
संग्रहित छायाचित्र.

पुणेः आपल्या अवीट साहित्यप्रतिभेने मराठी भाषकांना मोहिनी घालणारे रानकवी पद्मश्री ना. धों. महानोर यांच्या हस्ते उस्मानाबाद येथे होणाऱ्या 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी ही माहिती दिली.

93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुढच्या वर्षी 10,11 आणि 12 जानेवारी रोजी उस्मानाबादेत होत आहे. प्रसिद्ध साहित्य- विचारवंत फादर फ्रान्सिक दिब्रिटो यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या साहित्य संमेलनाची मराठवाडा साहित्य परिषदेची उस्मानाबाद शाखा आयोजक संस्था आहे. सध्या या साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरू आहे. उस्मानाबादकरांच्या विनंतीला मान देऊन ना.धों. महानोरांनी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचे मान्य केले आहे. महानोरांच्या सहवासामुळे साहित्य क्षेत्रातील प्रतिभेला आणि नवोदित लेखक, कवींना ऊर्जा मिळेल. संमेलनाची रूपरेषा निश्‍चित करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच या साहित्य संमेलनाची निमंत्रण पत्रिका काढण्यात येईल, असेही तावडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा