भारतात २४ तासांत आढळले ९४ हजार ३७२ कोरोना पॉझिटिव्ह, रूग्णसंख्या ४७ लाखांच्याही पुढे

0
1
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः  देशात २४ तासांत ९४ हजार ३७२ कोरोना बाधित रूग्ण आढळले तर १ हजार ११४ लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आजपर्यंत आढळलेल्या एकूण कोरोना बाधितांची संख्या ४७ लाख ५४ हजार ३५७ वर पोहोचली असून मृतांची संख्या ७८ हजार ५८६ झाली आहे.

 आजवर आढळलेल्या रूग्णांपैकी ३७ लाख २ हजार रूग्ण बरे होऊन घरी गेले असून सध्या जवळपास ९ लाख ७३ हजार कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली. महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या १० लाख ३७ हजार ७६५ झाली आहे तर २९ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

मुंबईपेक्षा पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या अधिक आहे. पुण्यातील कोरोना बाधितांची संख्या २ लाख २० हजार ६९५ झाली आहे तर आतापर्यंत ५०५९ कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतील कोरोना बाधितांची संख्या १ लाख ६७ हजार ६०८ वर गेली आहे तर ८ हजार १०६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

आंध्र प्रदेशात एकूण ५ लाख ५८७ कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण झाले आहेत तर मृतांची संख्या ८ हजार ३०७ वर गेली आहे. कर्नाकटातील रूग्णसंख्या ४ लाख ४९ हजार ५५२ तर मृतांची संख्या ७ हजार १६१ झाली आहे. उत्तर प्रदेशातील एकूण रूग्णसंख्या ३ लाख ५ हजारांहून अधिक तर मृतांची संख्या  ४ हजार ३४९ वर गेली आहे. दिल्लीतील बाधितांची संख्या  २ लाख १४ हजार ६९ आहे तर मृतांचा आकडा  ४ हजार ७५१ झाला आहे.

 जगभरातील कोरोना बाधितांची संख्या २ कोटी ८६ लाख ६१ वर पोहोचली आहे. तर एकूण मृतांची संख्या  ९ लाख १९ हजार ९४ झाली आहे. आजवर आढळलेल्या रूग्णांपैकी १ कोटी ९३ लाख रूग्ण बरे झाले आहेत. अमेरिकेतील एकूण रूग्णसंख्या ६४ लाख ८३ हजार तर मृतांची संख्या १ लाख ९३ हजार ६७६ झाली आहे. ब्राझीलमध्ये ४३ लाख १५ हजार कोरोना बाधित रूग्ण असून  १ लाख ३१ हजार २१० लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांच्या रूग्णसंख्येत भारताने ब्राझीलला मागे टाकले असून भारत सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा