अजित पवारांना सिंचन घोटाळ्यातील 20 पैकी 9 प्रकरणांत क्लीनचीट, एसीबीने तपास थांबवला

0
233
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील 20 पैकी 9 भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चीट देण्यात आली आहे. या9 प्रकरणांत अजित पवारांविरुद्ध कोणताही पुरावा सापडला नसल्यामुळे सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ( एसीबी) या प्रकरणाचा तपास थांबवून फाइल बंद केली आहे. राज्यातील सत्तापेचाचे राजकारण टिपेला पोहोचले असतानाच ही बातमी येऊन धडकल्यामुळे सगळेच अवाक झाले आहेत.

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सरकार स्थापन होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असतानाच ऐनवेळी सगळ्यांनाच धक्का देत अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे राज्यात भाजपचे सरकार आले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. या घटनेला दोन दिवसही उलटत नाहीत, तोच अजित पवारांना महाराष्ट्र सरकारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पहिला दिलासा मिळाला आहे. राज्यात 199 ते 2014 या काळात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सरकार असताना अनेक सिंचन प्रकल्पांना मंजुरी देताना आणि या प्रकल्पांची अंमलबजावणी करताना हा 70 हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. सिंचन घोटाळा प्रकऱणात अजित पवारांना ऑर्थर रोड तुरूंगात टाकू अशी घोषणा भाजपने केली होती. मात्र त्यांच्याच पाठिंब्याने सरकार स्थापन केल्यावर भाजपच्या गंगाजलाने अजित पवार पवित्र झाले आणि सिंचन घोटाळ्यातील भ्रष्टाचार आणि अनियमिततेच्या 9 प्रकरणांच्या तपासाची फाइल सोमवारी बंद करण्यात आली आहे.  अजित पवार यांची या नऊ प्रकणात कोणताही हात नसल्यामुळे या प्रकरणाचा तपास थांबवण्याची शिफारस आम्ही केली आहे. अन्य प्रकरणांचा तपास सुरू आहे. आम्ही सिंचन घोटाळ्यातील 3000 निविदांचा तपास करत आहोत. असे लाचलुचपत खात्याचे महासंचालक परमवीर सिंघ यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा