देवेंद्र फडणवीसांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्यावर तडीपारीची कारवाई

0
387
संग्रहित छायाचित्र.

पुणेः विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तृतीयपंथीयाशी समलैंगिक संबंध असल्याचा दावा करणाऱ्या युवराज दाखले या व्यक्तीवर आता थेट तडीपारीची कारवाई केली जाणार आहे. पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

 देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना एका तृतीयपंथी व्यक्तीला खोटे आश्वासन देऊन त्याच्यासोबत समलैंगिक संबंध ठेवले होते, असा वादग्रस्त आरोप करणारा व्हिडीओ युवराज देखले याने पोस्ट केला होता. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. काँग्रेसचे नाना पटोले यांनी विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करत कारवाईची मागणी केली होती. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित व्यक्तीवर कारवाईचे आश्वासन दिले होते.

अजित पवारांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वाकड पोलिसांनी पिंपरी चिंचवडमध्ये युवराज देखलेला बेड्या ठोकल्या होत्या. युवराज दाखले याच्यावर फसवणुकीसह सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत. मुंबई, शिक्रापूर, चाकण, सांगवी आणि वाकड पोलिसांत त्याच्याविरुद्ध दाखल असलेले गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत, असे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा