अभिनेत्री कंगनाला ‘कामोन्मादा’ने पछाडले, लिक व्हॉटस्ऍप चॅटमध्ये अर्णब गोस्वामींचा गौप्यस्फोट!

0
1953
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः ट्विटरवर बेफाम आणि बेलगाम शेरेबाजी करून कायम वादाच्या भोवऱ्यात राहणारी अभिनेत्री कंगना रनौतला ‘इरोटोमॅनिया’  म्हणजेच कामोन्मादाने पछाडले आहे. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनीच हा गौप्यस्फोट केला आहे. अभिनेता ऋतिक रोशन आणि कंगना रनौतच्या कथित अफेयरबाबत चर्चा करताना अर्णब यांनी कंगनाला कामोन्मादक म्हटले आहे.

टीआरपी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि बार्कचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्यातील व्हॉट्सऍप चॅट शुक्रवारी सोशल मीडियावर लिक झाला. या व्हॉट्सऍप चॅट अर्णब यांनी अभिनेत्री कंगना रनौतबद्दल हा गौप्यस्फोट केला आहे. अभिनेता ऋतिक रोशन आणि कंगना रनौतच्या कथित अफेयरची चर्चा पार्थ आणि अर्णब यांनी या संवादात केली आहे.

पार्थ दासगुप्ता आणि अर्णब गोस्वामी यांच्यात ७ ऑक्टोबर २००१७ रोजी व्हॉट्सऍपवर हा संवाद झाला आहे. या संवादात अर्णब आधी ऋतिक रोशनच्या त्यांनी घेतलेल्या अडीच तासाच्या मुलाखतीचा हवाला देतात. ही मुलाखत सर्व रेकॉर्ड ब्रेक करेल, असा विश्वासही व्यक्त करतात. त्यावर ऋतिक रोशनने ऑफ कॅमेरा काय सांगितले, हे मला सांगा, कंगनाने कुठे तरी उत्तर दिल्याचे पाहिले आहे, असे पार्थ दासगुप्ता म्हणतात.

ऋतिक रोशन मुका तर कंगना रनौत मानसिक रुग्ण आहे, असे मला वाटते, असेही पार्थ दासगुप्ता म्हणतात. पार्थ यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना ‘तिला इरोटोमॅनिया’ आहे, असे अर्णब गोस्वामी म्हणतात. त्यावर ते काय असते? अशी विचारणा पार्थ करतात. त्यावर तिला त्याच्याशी लैंगिक संबंध ठेवण्याची तीव्र इच्छा आहे, असे अर्णब म्हणतात.

याच संवादात अर्णब गोस्वामी कंगना रनौत बडबड करते, पण तो नाही, असे म्हणतात. त्यावर पार्थ म्हणतात.. हो खरे आहे. ती बडबड करते. सगळीकडे. माझ्या मते ती संपून जाईल, असे म्हणतात. त्यावर तिने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत, असे अर्णब म्हणतात. त्यावर पार्थ म्हणतात, हो. पागल. लोक तिला घाबरतात. ती काय करेल याची लोकांना भीती वाटते.

इरोटोमॅनिया म्हणजे नेमके काय?: Erotomania  या इंग्रजी शब्दाचा मराठीत अति लैंगिक इच्छा असा आहे. एखादी व्यक्ती (सामान्यतः स्त्री) असा विश्वास ठेवते की दुसरी व्यक्ती (विशेषतः उच्च सामाजिक दर्जाची) त्याच्या प्रेमात आहे, असा भ्रम बाळगते, तेव्हा इरोटोमॅनिया म्हणजेच कामोन्मादकतेने पछाडले जाते.

अर्णब गोस्वामी आणि पार्थ दासगुप्ता यांच्यात व्हॉटस्ऍपव झालेला आणि सोशल मीडियावर लिक झालेला हाच तो संवाद

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा