सहा डिसेंबरला नवबौद्ध फुकट मुंबई दर्शनास येतातः अभिनेत्री केतकी चितळेची आक्षेपार्ह पोस्ट

1
2025
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सहा डिसेंबरला नवबौद्ध फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू असा शब्द उद्गारला तर घोर पापी, कट्टरवादी? अशी आक्षेपार्ह पोस्ट अभिनेत्री केतकी चितळे हिने फेसबुकवर टाकली आहे. या प्रकरणी मुंबईच्या भांडूप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

केतकी चितळे हिने तिच्या अधिकृत फेसबुक पेजवर भली मोठी आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. त्यात तिने मुस्लिम, ख्रिश्चन, शीख अशा सर्वच धर्मांचे दाखले देत टीका केली आहे. ‘तुम्ही बुरख्यात राहिलात, मुसलमान आहोत हे दाखवून देणारी टोपी घातली तर ते धर्म स्वातंत्र्य आहे,’ असेही तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. ‘नवबौद्ध ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क. आम्ही फक्त हिंदू असा शब्द उद्गारला तर घोर पापी, कट्टरवादी! पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत. आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो,’ असे केतकी चितळेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

या पोस्टमध्ये केतकी चितळेने नवबौद्धांविषयी केलेल्या विधानांवर काही आंबेडकरवादी संघटनांनी आक्षेप घेतला आहे. या विधानातून नवबौद्धांविषयी केतकीच्या मनात असलेला द्वेष दिसून येतो. त्यामुळे केतकीवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रिपाइंचे( खरात) राजू धाटे यांनी भांडूप पोलिसांकडे केली आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा