खुश खबर!, राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश क्षमतेत वाढ

0
95
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयातील पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिली.

मुंबईच्या टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज व नायर चॅरीटेबल रुग्णालयात एम.डी. नेफ्रॉलॉजी या विषयाकरिता विद्यार्थी प्रवेश क्षमतावाढ १ वरुन ३ करण्यात आली आहे. तर यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी. ॲनेस्थेसियोलॉजी या विषयात सुरु करण्यात आलेल्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी प्रवेश क्षमता चार असणार आहे.

न्यूजटाऊन एक्सक्लुझिव्हः डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापक भरती घोटाळ्यातील एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट वाचा एका क्लिकवर, वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे एम.डी. जनरल मेडिसीन आणि एम.एस.जनरल सर्जरी या दोन विषयातील अभ्यासक्रमासाठीच्या विद्यार्थी प्रवेश क्षमतेत अनुक्रमे तीन वरुन सहा आणि तीनवरुन पाच इतकी वाढ करण्यात आली आहे.

कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी मायक्रोबॉयलॉजी, एम.डी. पॅथोलॉजी, एम.डी. फार्माकॉलॉजी, एम.डी रेसपीरेटरी मेडिसीन या चार अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे ३, ४, ३ आणि २ इतकी विद्याथी प्रवेश क्षमता नव्याने करण्यात आली आहे. याशिवाय याच वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी. ॲनेस्थेसियोलॉजी, एम .डी. ऑर्थो, एम.डी जनरल मेडिसीन, एम.एस. जनरल सर्जरी, एम.एस. अबस्टेट्रिक्स आणि गॉयनाकॉलॉजी, एम.डी. बॉयो केमिस्ट्री, आणि एम.एस. ऑपथलमोलॉजी,  या ७ अभ्यासक्रमासाठी अनुक्रमे ४, ३, ९, ३, ३, ४ आणि २ इतकी विद्याथी प्रवेश क्षमता वाढ करण्यात आली आहे.

एम.डी रेडिओ डॉयगॉनासिस आणि एम.डी पेडियॉट्रीक्स या २ विषयात नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविदयालयातील प्रवेश क्षमतेत अनुक्रमे ५ वरुन ६ आणि ४ वरुन ६ इतकी वाढ करण्यात आली आहे.

चला उद्योजक बनाः शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून कर्ज/सबसिडी मिळवायची?, पण कशी? वाचा सविस्तर

लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी डरमॅटोलॉजी, वेनेरीओलॉजी आणि लेप्रोसी  या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम सुरु करण्यास मान्यता दिली असून येथील विद्यार्थी प्रवेश क्षमता ३ असणार आहे.

पुण्यातील बे.जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एम.डी ईमरजंन्सी मेडिसीन हा अभ्यासक्रम ३ विद्यार्थी प्रवेश क्षमतेसह सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा