आकरावीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार!

0
56
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे खोळंबलेली आकारावीची प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासाठी राज्याच्या महाअधिवक्त्यांशी चर्चा करत असून विविध पर्यायांची चाचपणी करत आहेत.

 मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती मिळाल्यामुळे आकरावीची प्रवेश प्रक्रिया खोळंबली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या मुद्यावर चर्चा झाली. मराठा आरक्षणाचा प्रश्न असताना आकरावीचे प्रवेश कसे करता येतील, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याच्या महाअधिवक्त्यांशी चर्चा करत आहेत. ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांचे हित जोपासून आकरावीची प्रवेश प्रक्रिया कशी सुरु करता येईल? मराठा आरक्षणाचा प्रश्न अधांतरी असताना ही प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यासाठी काय काय कायदेशीर पर्याय आहेत? याबाबत मुख्यमंत्री ठाकरे महाअधिवक्त्यांशी चर्चा करत आहेत. त्यांच्याकडून योग्य कायदेशीर पर्याय सूचवण्यात आल्यानंतर ही प्रवेश प्रक्रिया शक्य तितक्या लवकर सुरु करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा