कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कर्मचाऱ्यांचा होणार शासकीय सेवेत समावेश, समिती स्थापन

0
103
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पावले उचलली असून सहसंचालक पणन यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

 सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्य बाजार समिती  कर्मचारी संघाची बैठक झाली. या बैठकीत ही समिती स्थापन करण्याचा निर्णय झाला. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक असल्याचे आश्वास यावेळी पाटील यांनी कर्मचारी

खुल्या बाजारातून मिळणारा सेस हाच बाजार समितीच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहे. परंतु शासनाच्या नियमन मुक्ती धोरणामुळे बाजार समितीच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होऊन अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे  तेलंगणा, तमिळनाडू आणि कर्नाटक  या राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात सुध्दा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना  शासकीय सेवेत सामावून घ्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य बाजार समिती  कर्मचारी संघाच्या वतीने यावेळी करण्यात आली.

  या कर्मचाऱ्यांच्या अडचणीसंदर्भात शासन सकारात्मक असून या सर्व अडचणी आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी सहसंचालक पणन यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात यावी आणि या समितीने कालमर्यादेत आपला आहवाल शासनाकडे सादर करावा. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर बाबी तपासून यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असेही पाटील यांनी सांगितले.

 बैठकीला पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार पणन महामंडळाचे संचालक सतिश सोनी, व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार, महाराष्ट्र राज्य बाजार समिती कर्मचारी संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा