शादी करेंगे ना? कुंवारे मत रहना, ये लोग देश को बहुत परेशान कर रहे हैः ओवेसींचा तरूणांना सल्ला

0
170
छायाचित्र सौजन्यः एमआयएम/ट्विटर

मुंबईः एमआयएमचे  अध्यक्ष खासदार असदोद्दीन ओवेसी यांनी मुंबईतील सभेत तरूणांबाबत केलेले एक विधान सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले आहे. ‘लग्न करणार ना? बॅचलर राहू नका. बॅचलर लोक खूपच त्रास देतात…’ असे ओवेसी यांनी म्हटले आहे.

मुस्लीम आरक्षण आणि वक्फ जमिनीच्या संरक्षणाच्या मागणीसाठी एमआयएमच्या वतीने शनिवारी औरंगाबाद ते मुंबई अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली होती. ही तिरंगा यात्रा मुंबईत पोहोचल्यानंतर चांदीवली मैदानावर शनिवारी आयोजित सभेत खा. ओवेसी बोलत होते.

चला उद्योजक बनाः  एनएलएम योजनेत कुक्कुट, शेळी, मेंढी, वराह पालनासाठी असे घ्या अर्थसहाय्य

या सभेत बोलताना खा. ओवेसी यांनी मुस्लीम तरूणांना विचारले की, तुमची मुले अशिक्षित आणि गरीब रहावीत असे तुम्हाला वाटते का? जे १८-१९ वर्षांचे तरूण आहेत, ते लवकरच लग्न करतील आणि त्यांना मुलेबाळेही होतील. लग्न करणार ना?, असा सवाल ओवेसी यांनी केला.

 तुमची मुले त्यांच्या अधिकारापासून वंचित राहिली पाहिजे असे तुम्हाला वाटते का?, अशी विचारणा मुस्लीम तरूणांना करतानाच ‘ बॅचलर राहू नका. बॅचलर लोक खूप त्रास देतात. घरात राहिले की माणसाचे डोके शांत रहाते,’ असे खा. ओवेसी म्हणाले.

महाराष्ट्रात ४.९ टक्के मुस्लीम पदवीधर आहेत. प्राथमिक शाळेत २२ टक्के, माध्यमिक शाळेत १३ टक्के आणि कॉलेजमध्ये ११ टक्के मुस्लीम लोकसंख्या शिक्षण घेत आहे. मुस्लिमांना शिक्षण घ्यायचे आहे. परंतु फीस द्यायला पैसे नसल्यामुळे ते शिकू शकत नाहीत. परंतु मुस्लिमांना शिक्षणच घ्यायचे नाही, असे आरएसएस खोटे सांगत आहे, असे खा. ओवेसी म्हणाले.

खा. ओवेसी यांनी मुस्लीम आणि मराठा समाजाची तुलना करताना वार्षिक आकडेवारी दिली आणि म्हणाले की, मराठा समाज सुस्थितीत आहे. महाराष्ट्रात भूमिहीन मुस्लिमांची संख्या ८३ टक्के आहे तर केवळ ८ टक्के मराठा समाज भूमिहीन आहे, असे ओवेसी म्हणाले.

मागच्या निवडणुकीत आमच्या पक्षाला मते मिळाली नाहीत. मी जनादेशाचा आदर करतो, असे सांगताना ओवेसी म्हणाले, मी आपल्या जनादेशाचा आदर करतो. तुम्ही कधीपर्यंत तुमचे डोळे बंद करणार? धर्मनिरपेक्षतेने आम्हाला काहीही दिलेले नाही. तरीही मुस्लीम धर्मनिरपेक्षतेचा आग्रह धरतो. माझा राजकीय धर्मनिरपेक्षतेवर विश्वास नाही, तर संवैधानिक धर्मनिरपेक्षतेवर माझा विश्वास आहे, असे खा. ओवेसी म्हणाले.

संविधानाच्या परिशिष्ट १५ आणि १६ मध्ये सामाजिक आणि मागास लोकांना आरक्षण देण्याची तरतूद आहे. मुस्लिमांना आरक्षण दिले पाहिजे, असे मुंबई उच्च न्यायालयानेही म्हटले आहे. परंतु महाराष्ट्र सरकारला त्याचाच विसर पडला आहे, असे ओवेसी म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा