मोटार वाहनांच्या पुढच्या सीटवर एअर बॅग अनिवार्य, १ एप्रिलपासून नियम लागू

0
105
प्रातिनिधिक छायाचित्र.

नवी दिल्लीः देशातील रस्ते अपघात आणि त्यात होणारे मृत्यूचे प्रमाण चिंताजनक असून मोटार वाहन अपघातातील मृत्यूचे प्रमाण टाळण्यासाठी आता मोटार वाहनांच्या पुढच्या सीटवर एअर बॅग अनिवार्य करण्यात आली असून येत्या १ एप्रिलपासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे. नव्या आणि जुन्या वाहनांसाठीही एअर बॅग अनिवार्य करण्यात आली आहे.

रस्ते अपघातात मोटार वाहनात समोरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांच्याच जीवाला जास्त धोका असतो. समोरच्या सीटवर बसलेल्या प्रवाशाला अनेक अपघातात जीवही गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी १ एप्रिल २०२१ किंवा त्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या सर्व मोटार वाहनांसाठी पुढच्या सीटवर एअर बॅग अनिवार्य करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज मार्ग मंत्रालयाने याबाबतचे गॅझेट प्रसिद्ध केले आहे.

सुरक्षिततेचा उपाय म्हणून मोटार वाहनात वाहन चालकाच्या बाजूच्या सीटवरील प्रवाशांसाठी एअर बॅग अनिवार्य करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा समितीने याबाबतची शिफारस केली होती.

१ एप्रिल २०२१ किंवा त्यानंतर तयार होणाऱ्या मोटार वाहनांना पुढच्या सीटवर एअर बॅग अनिवार्य असेल. जुन्या वाहनांना ३१ ऑगस्ट २०२१ पासून सध्याच्या माडेलपर्यंत चालकाच्या बाजूच्या सीटसोबत एअर बॅग लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. या नव्या निर्णयामुळे रस्ते अपघाताच्या परिस्थितीत पुढच्या सीटवर बसणाऱ्या प्रवाशांची सुरक्षितता निश्चित होईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा