शिखर बँक घोटाळ्याच्या पुराव्यात शरद पवारांचे नावच नाही, मग ईडीने आणलेच कसे ? : अण्णा हजारे

0
171

राळेगणसिद्धीः शिखर बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी) गुन्हा नोंदवल्यामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच या बँक घोटाळ्याच्या पुराव्यात शरद पवारांचे नावच नाही. त्यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर मग त्यांचे नाव आता पुढे आलेच कसे? असा सवाल करत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे.

शिखर बँक घोटाळा प्रकरणी दोषींवर कारवाई झाली पाहिजे, परंतु ज्यांचा या प्रकरणाशी संबंध नाही किंवा दोषी नाहीत त्यांना विनाकारण अडकवू नये, असे हजारे यांनी राळेगणसिद्धीत पत्रकारांशी बोलताना सांगितले. शिखर बँक घोटाळा प्रकणाच्या शरद पवारांचे नाव कुठेही नाही. त्यांचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही. हे सत्य आहे. जे सत्य आहे, ते सत्यच आहे. खोटे आरोप करणे आणि विनाकारण कोणाला अडकवणे चुकीचे आहे, असे हजारे म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा