अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

0
309
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः पानटपरी चालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात माजी आमदार आणि मनसे नेते हर्षवर्धन जाधव यांना अटकपूर्व जामीन देण्यास विशेष न्यायाधीश अभिनंदन पाटणंगणकर यांनी नकार दिला आहे. त्यामुळे जाधव यांना आता कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते.

बनेवाडी येथील पानटपरी चालक नितीन रतन दाभाडे यांच्या तक्रारीवरून हर्षवर्धन यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाभाडे यांनी औरंगाबादच्या जिल्हा न्यायासमोरील सिग्नलजवळ पानटपरी सुरु केली व तेथे निळा झेंडा लावला. 29 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हर्षवर्धन जाधव तेथे आले. त्यांनी ज्या जागी टपरी व निळा झेंडा लावला ती जागा माझ्या मालकीची आहे. त्यामुळे टपरी व झेंडा हटव असे दाभाडे यांना सांगितले. त्यावरून दोघांत वाद झाला व जाधव यांनी दाभाडे यांना जातीवाचक शिवीगाळ करुन टपरी व झेंडा हटवला नाही तर, जीवे मारीन अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकारानंतर रविवारी रात्री दाभाडे यांनी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन हर्षवर्धन जाधव यांच्या विरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर हर्षवर्धन जाधव यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता सहाय्यक लोकाभियोक्ता अजीत अंकुश यांनी गुन्ह्याचा तपास प्राथमिक अवस्थेत असून आरोपीला जामीन दिल्यास तो फिर्यादीवर दबाव आणू शकतो. त्यामुळे अरोपीला जामीन देऊ नये, अशी विनंती न्यायालयाकडे केली. ती मान्य करुन न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा