आता घरबसल्या करा अकरावीची प्रवेश प्रक्रिया, राज्य शिक्षण मंडळाने सुरू केला App

0
76
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबईः अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे आता आणखी सोपे झाले आहे. या प्रवेश प्रक्रियेतील गोंधळ आणि किचकट प्रक्रियेवर मात करण्यासाठी राज्य शिक्षण मंडळाने मोबाईल ऍपची निर्मिती केली आहे. अकरावीला प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी आता POEAM ऍपच्या माध्यमातून प्रवेशाची प्रक्रिया घर बसल्या पूर्ण करू शकतील. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

सध्या हे मोबाइल ऍप अँड्रॉइंड मोबाइल यूजरसाठी आहे. आयओएस यूजरसाठीही लवकरच हे ऍप उपलब्ध होणार आहे. गुगल प्ले स्टोअरवर हे ऍप उपलब्ध करून देण्यात आले आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर आणि अमरावती या महानगरपालिका क्षेत्रात अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय पद्धतीने होत आहे. त्या विद्यार्थ्यांसाठीच हे ऍप आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा