जिल्हास्तरीय युवा पुरस्काराकरिता प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन

0
6
प्रातिनिधिक छायाचित्र.

मुंबई: क्रीडा व युवकसेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत सन २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षाच्या जिल्हा युवा पुरस्काराकरिता मुंबई शहर जिल्ह्यातील युवक-युवती आणि सामाजिक युवकांसाठी अर्ज करणाऱ्या संस्थांनी पुरस्काराकरीता प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांनी केले आहे.

जिल्ह्यातील युवकांनी व सामाजिक संस्थांनी केलेल्या समाजहिताच्या कार्याचा गौरव व्हावा व युवा विकासाचे कार्य करण्याकरीता त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी जिल्हा युवा पुरस्कार देण्यात येतात. सन २०१९-२० आणि २०२०-२१ या दोन वर्षाकरिता २ युवक, २ युवती आणि २ संस्था असे एकूण ६ पुरस्कार देण्यात येणार आहेत.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

असे आहेत पुरस्कारांचे निकषः

(अ) युवक व युवती पुरस्कार-

१. पुरस्कार वर्षाच्या १ एप्रिल रोजी पुरस्कार्थीचे वय १३ वर्ष पूर्ण असावे तसेच ३१ मार्च रोजी वय ३५ वर्षाच्या आत असले पाहिजे.

२. अर्जदार हा मुंबई शहर जिल्हात सलग ५ वर्षे वास्तव्यात असला पाहिजे.

३. अर्जदाराने केलेल्या कार्याचे सबळ पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. वृतपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफित व फोटो अर्जासोबत जोडावेत.

४.केंद्र, राज्य, निमशासकिय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, विद्यापीठ अंतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक / कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाहीत.

(ब) संस्था युवा पुरस्कार

१.संस्थेची नोंदणी झाल्यानंतर संस्था पुढील पाच वर्षे कार्यरत पाहिजे.

२. संस्था सर्वजनिक विश्वास्त अधिनियम १८६० मुंबई किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट अँक्ट १९५० अंतर्गत नोंदणीबद्ध असावी.

३. गुणांकणाकरिता संस्थेने केलेल्या कार्याचे वृत्तपत्र कात्रणे, प्रशस्तीपत्रे, चित्रफित व फोटो जोडावेत.

पुरस्काराकरिता इच्छुकांनी विहीत नमुन्यातील अर्ज १५ डिसेंबर २०२१ पर्यंत सुट्टीचे दिवस वगळुन कार्यालय वेळेमध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मुंबई शहर भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, २ रा मजला, धारावी बसडेपो जवळ, धारावी (प), मुंबई-४०००१७ येथे सादर करावेत. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक ८४५९५८५८४१ यावर संपर्क साधावा, असे मुंबई शहरचे जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा