मोठी बातमीः बिपीन रावत यांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले, चार मृतदेह हाती

0
494

कोईम्बतूरः भारतीय संरक्षण दलांचे प्रमुख (सीडीएस) बिपीन रावत आणि त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन जाणारे लष्कराचे हेलिकॉप्टर तामिळनाडूतील कुन्नूरजवळ कोसळले. कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान हेलिकॉप्टर कोसळून ही भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य हाती घेण्यात आले असून आतापर्यंत चार जणांचे मृतदेह हाती लागले तर तीन जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती मिळते.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख बिपीन रावत हे एका व्याख्यानात सहभागी होण्यासाठी एमआय-१७ व्ही५ या भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरने प्रवास करत होते. या हेलिकॉप्टरमध्ये रावत यांच्या पत्नी मधुरिकासह त्यांचे कुटुंबीयही होते. लष्कराचे काही वरिष्ठ अधिकारी आणि रावत यांचे कुटुंबीय असे १४ जण या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. त्यापैकी ४ क्रू मेंबर होते. निलगिरी पर्वत रांगामध्ये आज दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी ही घटना घडली. अपघात झालेले ठिकाण डोंगराळ भागात असल्याने तेथे पोहोचण्यास अडचणी येत आहेत.

चला उद्योजक बनाः राज्यात औद्योगिकदृष्ट्या अविकसित, विकसनशील भागांसाठी पीएसआय योजना, कसा घ्यायचा लाभ?

स्थानिक लष्करी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. स्थानिक नागरिकही मदत आणि बचाव कार्य करत आहेत. हेलिकॉप्टर अपघात स्थळावरून आतापर्यंत चार मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत तर तीन जखमींना वाचवण्यात यश आले आहे. ही दुर्घटना कशी घडली याची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचाः फसवाफसवीचे कोण कोण भागीदार?: प्रा. तोटावाड यांना उच्च शिक्षण सहसंचालक, विद्यापीठाचे अभय?

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा