‘अर्णब गोस्वामी यांची अटक हा चौथ्या स्तंभावरील हल्ला नाही, कुणी उगाच गळे काढू नये!’

0
476
संग्रहित छायाचित्र.

पुणेः रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची अटक हे व्यक्तिगत प्रकरण आहे. या अटकेचा पत्रकारितेशी दुरान्वयानेही संबंध नाही. त्यामुळे अर्णब यांची अटक म्हणजे चौथ्या स्तंभावरील हल्ला वगैरे म्हणत कुणी गळे काढण्याची गरज नाही, असे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने म्हटले आहे.

२०१८ मध्ये अलिबाग तालुक्यातील कावीर येथील इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री कुमुद नाईक यांनी आत्महत्या केली होती. अर्णब गोस्वामी यांच्याकडून त्यांना कामाची मोठी रक्कम येणे बाकी होती. पण ती रक्कम ते देत नसल्यामुळे ही आत्महत्या झाल्याचे तेव्हा सांगण्यात येत होते. गोस्वामी यांच्या विरोधात तेव्हा अलिबाग पोलिसांनी गुन्हाही दाखल केला होता, पण पुढे कोणतीच कारवाई झाली नव्हती. त्यामुळे नाईक कुटुंबियांनी या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अलिबाग गुन्हा अन्वेषण विभागाने नव्याने चौकशी करून आज गोस्वामी यांना अटक केली आहे, असे पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे अध्यक्ष एस.एम. देशमुख यांनी म्हटले आहे.

हेही वाचाः रिपब्लिक चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक, रायगड पोलिसांची कारवाई

हेही वाचाः ठाकरे सरकारच्या बदनामीसाठी ट्विटरवर हॅशटॅग स्कॅमः मुंबई पोलिसांनी केला षडयंत्राचा भंडाफोड

 या विषयाचा पत्रकारितेशी दुरान्वयानेही संबंध नाही. दोघांच्या मृत्यूचा हा विषय आहे. त्यामुळे या अटकेचा निषेध उचित ठरणार नाही. पत्रकारितेची झुल पांघरूण वाट्टेल तसे उद्योग करणाऱ्यांची पाठराखण पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करू शकत नाही. कायद्याला त्याचे काम करू द्यावे, हेच उचित ठरेल. अर्णब गोस्वामी यांनी पत्रकारितेचे सर्व संकेत पायदळी तुडवले असून पत्रकारिता कशी नसावी, याचा नवा आदर्शच जगासमोर ठेवला आहे. त्यांची पत्रकारिताही समर्थनीय नाही, असेही पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा