धर्मसंस्कारित जातीचा वरचष्मा आणि लोहियावादी शक्तींचे विघटन!

0
105
संग्रहित छायाचित्र.

सांप्रदायिक शक्ती जाती अभिनिवेशावर पोसल्या जातात हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचा आधार जात आहे. एकएका जातील्या भिंती जितक्या मजबूत आणि जातीचा अभिनिवेश जितका सशक्त, तितकी सांप्रदायिक शेती सुपीक बनून फोफावते आणि त्याच्या कैकपट परिवर्तनवादी लोहियावादी शक्तींचे विघटन घडत जाते. या यादव पट्टयात हेच घडले. लोहियावादी विचारापेक्षा धार्मिक वळण घेतलेला जाती बंध यांच्या घाताला भारी पडला.

राजेश खनके

परिवर्तनवादी विचारापेक्षा स्वकीय जात संबंध बलवत्तर मानले. जाती अभिनिवेश घरातच नाही तर डोक्यावर घेतला.  त्याची काय अवस्था होतेय त्याचे जीवंत उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या यादवांच्या राजकारणाला बसलेला फटका.  मुलायम, अखिलेश आणि लालूंसारखे लोहियाचे वारसदार हे विसरले की आपल्या घरात केवळ आपला हरियानावी भाऊबंद नाही तर लोहियाविरोधी विचार प्रवेश करतोय. लोहियावादी विचारला सुरुंग लागला तो या घरोब्यातून.

देशाची सत्ता बदलणारी संख्यात्मक खासदार शक्ती याच प्रदेशातून येते. तिथला शेतकरी जो यादवांच्या सोबतीला होता तो आपल्या पारंपरिक ३६ किसान बिरदारीत विभागला आणि यादवांच्या दिग्विजयी राजकारणाला भगदाड पडले. सांप्रदायिक शक्ती जाती अभिनिवेशावर पोसल्या जातात हे लक्षात घेतले पाहिजे. त्याचा आधार जात आहे. एकएका जातील्या भिंती जितक्या मजबूत आणि जातीचा अभिनिवेश जितका सशक्त, तितकी सांप्रदायिक शेती सुपीक बनून फोफावते आणि त्याच्या कैकपट परिवर्तनवादी लोहियावादी शक्तींचे विघटन घडत जाते. या यादव पट्टयात हेच घडले. लोहियावादी विचारापेक्षा धार्मिक वळण घेतलेला जाती बंध यांच्या घाताला भारी पडला.

रामदेव बाबांची राजकीय निष्ठा यादवनिष्ठ नक्कीच नाही हे सर्व विदित आहे. त्यापासून राजकीयदृष्ट्या सावध राहण्याचे शहाणपण आणि राजकीय खेळी मात्र मुलायम आणि लालू या यादव घराण्याला जमली नाही. आणि यादव समाजदेखील आपसी जाती बिरदारीच्या यादवीत पुरता विभागला गेला.

गैरों में कहां दम था, हमे तो अपनोने लूटा।

हमारी कशती वहीं डूबी जहाँ पानी कम था।।

यूपी बिहारच्या यादव राजघराण्याला हे चपखल लागू पडतेय. कारण त्यांच्या यादव पट्ट्यातच त्यांचे राजकीय भूस्खलन झालेय.

शेतकरी आंदोलनात या ३६ बिरदारीच्या जाती पुन्हा शेतकरी या एकाच नावाखाली एकत्र येत आहेत. आठरापगड जाती बिरदारीला आलेले हे भान प्रस्थापितांना खटकतेय. म्हणून खलिस्तानी, आतंकवादी असे भावनिक भेद प्रवक्तेपण करणाऱ्या संस्था पसरवत आहेत.

पाकिस्तान चीनबरोबर तीन तीन युद्धात देशासाठी रक्त सांडणारे वीर या आंदोलनात आहेत. सीमेवर जो जवान आहे त्याचा बाप दिल्लीच्या सीमेवर आहे. त्याला आतंकवादी ,खलिस्तानी म्हणणारी जमात एक तर दांभिक आहे किंवा शेठ, कॉर्पोरेट धार्जिणी आहे. ती शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्याच्या व्यथा जाणणारी नक्कीच नाही!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा