पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस, तामिळनाडूत डीएमकेला स्पष्ट बहुमत; भाजपची दमछाक

0
205

नवी दिल्लीः पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची तृणमूल काँग्रेस तर तामिळनाडूत डीएमकेची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरू आहे. पश्चिम बंगालमध्ये आम्हीच विजय होऊ असा दावा करणाऱ्या भाजपची १०० जागांवर आघाडी घेतानाही चांगलीच दमछाक होत आहे.

२९४ सदस्यांच्या पश्चिम बंगाल विधासभेत बहुमतासाठी १४८ जागांवर विजय मिळवणे आवश्यक असताना ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने १७७ जागांवार आघाडी घेतली आहे. सगळ्यांचे लक्ष लागून असलेल्या भाजपने मात्र १०९ जागांवर आघाडी घेतली आहे. पश्चिम बंगालची निवडणूक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिष्ठेची केली होती. भाजपच विजयी होणार, असे दावे या दोन्ही नेत्यांनी प्रचारसभांमधून केले होते.

२३४ सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत डीएमकेने मुसंडी मारली आहे. तामिळनाडूत बहुमतासाठी ११८ जागांची गरज आहे. डीएमकेने १२५ जागांवर आघाडी घेतली आहे. तर एआयडीएमकेने ८२ जागांवर आघाडी घेतली आहे. केरळमध्ये माकपने ५३ आणि काँग्रेसने २७ जागांवर आघाडी घेतली आहे. भाकप १४ जागांवर आघाडीवर आहे.

आसाममध्ये भाजपने ६२ जागांवर आघाडी घेतली आहे. ३४ जागांवरील आघाडीसह काँग्रेस दुसऱ्या स्थानावर आहे. आसाम गण परिषद १० जागांवर आघाडीवर आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा