करूणा शर्माविरुद्ध परळीत ऍट्रॉसिटीचा गुन्हा, वैजनाथ मंदिरात केली जातीवाचक शिवीगाळ

0
3224
संग्रहित छायाचित्र

बीडः परळीत येऊन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या कुटुंबावर केलेल्या कथित अत्याचाराचा पर्दाफाश करण्याची घोषणा करणाऱ्या मुंबईच्या करूणा शर्मा यांच्यावर परळीत ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. करूणा शर्मा ज्या गाडीतून आल्या होत्या, त्या गाडीत पिस्टल सापडल्याने त्या आधीच अडचणीत आलेल्या असताना त्यांच्याविरोधात ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यामुळे त्या आणखीच अडचणीत सापडल्या आहेत.

करूणा शर्मा यांनी गुरूवारी फेसबुक लाइव्ह करून आपण परळीत येऊन आपल्यावरील अत्याचाराचा पर्दाफाश करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज त्या परळीत दाखल झाल्या.त्या परळी वैजनाथ मंदिरात आल्या असताना रेटारेटी झाली. याच वेळी करूणा शर्मा यांनी आपणास जातीवाचक शिविगीळ केल्याची तक्रार विशाखा रविकांत घाडगे यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात दिल्यावरून हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचाः  अपने को तो रायता फैलाना है, पैसे निकालने है प्रेशर बनाके… ऐका करुणा शर्माची व्हायरल कॉल रेकॉर्डिंग!

विशाखा घाडगे या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या तालुका संयोगिनी आहेत. आपण रचना व्हावळे, दिपमाला सोनकांबळे, बेबी तांबोळी या मैत्रिणींसोबत वैजनाथ मंदिरात दर्शनासाठी गेलो असता तेथे एक महिला व एक पुरूष मंदिरासमोरील पायऱ्यासमोर थांबून जोरजोरात बोलत होते. धनंजय मुंडे गुंडा है, साला राजश्री मुंडे उसकी रखेल है. मैं उसकी पत्नी हुं. मैं धनंजय मुंडे का राजनैतिक करियर खतम करके और उसको बी खतम कर दूंगी. उसके बगैर यहां से नहीं जाऊंगी असे म्हणून शिविगाळ करू लागली. तेव्हा आम्ही तुम्ही धनंजय मुंडे हे आमचे दैवत आहेत. तुम्ही त्यांना व वहिणींना वेडेवाकडे बोलू नका, असे म्ङणाल्या नंतर तुम्ही जमलेले लोक हलक्या जातीचे महार, मांग, मुस्लीम जातीचे दोनशे रुपये घेऊन येथे जमले आहात. तुमची औकात काय आहे, असे बोलून जातीवाचक शिविगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. ही महिला करूणा शर्मा आणि तिच्या सोबतच्या पुरूषाचे नाव अरूण दत्तात्रय मोरे असल्याचेही या फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

विशाखा घाडगे यांच्या फिर्यादीवरून परळी शहर पोलिसांनी  भादंविच्या कलम ३०७, ३२३, ५०४, ५०६, ३४ आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३(१)(आर), ३(१)(एस) आणि ३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा