कोरोना सेंटर बलात्कार प्रकरणात ट्विट्सः डॉक्टर आणि पॉझिटिव्ह महिलेचा पती जवळचे मित्र…

0
1140
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद/मुंबईः औरंगाबादेतील पदमपुरा येथील कोरोना सेंटरमध्ये पॉझिटिव्ह महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केलेल्या डॉक्टरची हकालपट्टी करण्यात आली असून या प्रकरणाला वेगळाच ट्विट्स मिळण्याची शक्यता आहे. पीडित महिलेचा पती आणि आरोपी डॉक्टर हे दोघेही जवळचे मित्र असल्यामुळे हे प्रकरण ‘वेगळे’ असण्याची शक्यता आहे.

पदमपुरा येथील महापालिकेच्या कोरोना केअर सेंटरमध्ये दोन दिवसांपूर्वीच दाखल झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेवर या सेंटरमध्ये काम करणाऱ्या आयुष डॉक्टरने मंगळवारी मध्यरात्री बलात्काराचा प्रयत्न केला होता. डिस्चार्ज देण्याचे आमिष दाखवून आधी त्याने तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. महिलेने नकार देताच त्याने तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. महिला रुग्णाने आरडाओरड केल्यामुळे कोरोना सेंटरमध्ये एकच गोंधळ उडाला. त्यानंतर त्या महिलेच्या नातेवाईकांनी कोरोना सेटंरमध्ये घुसून त्या डॉक्टरची धुलाई केली होती. महापालिका प्रशासनाने चौकशी करून त्या डॉक्टरची हकालपट्टी केली आहे.

हेही वाचाः औरंगाबादेत कोरोना सेंटरमध्येच महिला रुग्णावर डॉक्टरकडून बलात्काराचा प्रयत्न

या प्रकरणाचे पडसाद आज विधिमंडळातही उमटले. विरोधकांनी हा प्रश्न उपस्थित केला. महिलाच सुरक्षित नसल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र या प्रकरणातील दोषी डॉक्टरची हकालपट्टी करण्यात आली आहे. पीडित महिलेचा पती आणि आरोपी डॉक्टर हे दोघेही मित्र आहेत. त्यामुळे हे प्रकरण ‘वेगळे’ असू शकते, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले.

ही अत्यंत धक्कादायक घटना आहे. पदमपुऱ्याच्या कोरोना सेंटरमध्ये  महिलेवर बलात्कार झालेला नाही. मात्र कोरोना सेंटरमध्ये घडणारे असे प्रकार धोक्याची घंटा आहे. सरकारने या प्रकराची गंभीर दखल घेतली आहे.  वरिष्ठ महिला डॉक्टरमार्फत करण्यात आलेल्या प्राथमिक चौकशीत महिलेने केलेल्या आरोपात तथ्य आढळले आहे. डॉक्टरला निलंबित करण्यात आले आहे. अशा प्रकारचे प्रकार घडू नयेत म्हणून ३१ मार्चपूर्वी एसओपी निश्चित केली जाईल, असे पवार यांनी विधानसभेत सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा