युवकांच्या विविध मागण्यांसाठी औरंगाबादेत धडकला शेतकरी आक्रोश मोर्चा

0
93

औरंगाबादः राज्यातील शेतकर्‍यांचा सातबारा सरसकट कोरा करा, महापोर्टल आणि पवित्र पोर्टल रद्द करा, पोलीस भरती, शिक्षक भरती, एमपीएससीच्या जागा वाढवाव्यात आदी मागण्यांसाठी सोमवारी औरंगाबादेत शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. क्रांतीचौक ते विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत शेतकरी आणि युवकांच्या विवध प्रश्नांसाठी युवकांनी हा मोर्चा काढला होता. या मोर्चाचे नेतृत्व  पूजा मोरे यांनी केले. या मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीही सहभागी झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या औरंगाबादेतील महाजनादेश यात्रेच्यावेळी पूजा मोरे यांना पोलिसांनी दिलेली वागणूक चुकीची आणि संताप आणणारी आहे. अशी दडपशाही आम्ही खपवून घेतली जाणार नाही, आमच्या लेकीबाळींकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, असा इशारा राजू शेट्टी यांनी या मोर्चाच्या वेळी दिला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा