तलाठी भरतीः एसईबीसी वगळून अन्य उमेदवारांच्या नियुक्त्यांचा निर्णय घ्याः हाय कोर्टाचा आदेश

0
250
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः तलाठी भरती प्रकरणी एसईबीसी वगळून उर्वरित उमेदवारांना २५ नोव्हेंबरपर्यंत नियुक्त्या देण्याबाबत निर्णय घेण्याचा आदेश न्या.एस.व्ही. गंगापूरवाला आणि न्या. आर. जी. अवचट यांनी बीडच्या जिल्हाधिकार्‍यांना दिला आहे.

राज्य सरकारने २०१९ मध्ये प्रत्येक जिल्ह्यात तलाठी भरती प्रक्रिया राबवली. बीड जिल्ह्यातील तलाठी भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. परंतु बीडच्या जिल्हाधिकार्‍यांनी उमेदवारांना नियुक्त्या दिल्या नाहीत. त्यामुळे श्रीराम येवले व इतर ४२ उमेदवारांनी अ‍ॅड. सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती.

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवीन नियुक्त्या करू नयेत असा शासन आदेश ४ फेब्रुवारी रोजी जारी केला होता. दरम्यान ९ सप्टेंबरच्या पत्रान्वये शासनाने अहमदनगर जिल्हा वगळून राज्यातील इतर जिल्ह्यात नियुक्त्या देण्यात न आलेल्या उमेदवारांना तलाठीपदी नियुक्ती देण्याचे आदेश दिले होते. असे असताना बीडच्या जिल्हाधिकार्‍यांनी नियुक्त्या दिल्या नाहीत. निवड झालेल्या उमेदवारांपैकी ७ उमेदवार एसईबीसी प्रवर्गातील आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली असल्यामुळे काय निर्णय घ्यावा याबाबत त्यांनी राज्य सरकारकडे मार्गदर्शन मागवले होते. ९ सेप्टेंबरच्या अंतरिम आदेशानुसार एसईबीसी उमेदवार  वगळून इतरांना नियुक्त्या का दिल्या नाहीत, अशी विचारणा खंडपीठाने केली होती. त्यानंतर सरकारतर्फे वेळोवेळी निवेदने करण्यात आली. मात्र , नियुक्त्या दिल्या नाहीत म्हणून उच्च न्यायालयाने आता २५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा