मोहटादेवी विश्वस्त मंडळाला हाय कोर्टाचा दणकाः अंधश्रद्धा आणि गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी

0
305
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः पाथर्डी तालुक्यातील प्रसिद्ध मोहटादेवी मंदिराचा जिर्णोद्धारातील तब्बल ७५ लाख रुपयांचा आणि अंधश्रद्धा प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने विश्वस्त मंडळाला दणका दिला असून या प्रकरणाची उच्चाधिकाऱ्यामार्फत चौकसी करण्याचे आदेश दिले आहेत. ही चौकशी उपअधीक्षक किंवा अप्पर पोलिस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करावी, असे न्यायालयाच्या आदेशात म्हटले आहे. विशेष म्हणजे मोहटादेवी मंदिर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष हे जिल्हा न्यायाधीश असल्यामुळे या चौकशीमुळे तत्कालीन जिल्हा न्यायाधीशही अडचणीत सापडणार आहेत.

पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी मंदिर आई रेणुका मातेचे जागृत ठाणे समजले जाते. या मंदिराचा २०१० मध्ये जिर्णोद्धार करण्यात आला. परंतु रेणुका मातेच्या मूर्तीखाली ६४ योगीनींच्या मूर्ती आणि दोन किलो सोने पुरल्यास या मूर्तीला दैवीशक्ती प्राप्त होईल आणि त्याचा भक्तांना मोठा फायदा होईल, असे त्यावेळी वास्तुविशारदाने सांगितल्यानुसार मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला होता. हे सर्व करण्यासाठी मांत्रिकाने तब्बल २५ लाख रुपये मानधन घेतले होते. मूर्तीखाली पुरण्यासाठी ५० लाखांचे सोनेही खरेदी करण्यात आले होते. जिर्णोद्धारावरील या एकूण ७५ लाख रुपये खर्चाला तेव्हाच्या विश्वस्त मंडळाने मंजुरी दिली होती. या विश्वस्त मंडळावर तत्कालीन जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष होते.

हेही वाचाः शालेय शुल्क कमी किंवा माफ होणार का? राज्य सरकार म्हणते…

 सामाजिक कार्यकर्ते नामदेव गरड यांनी या एकूणच प्रकाराविरुद्ध २०१७ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील सुनावणीअंती खंडपीठाने चौकशीचे आदेश दिले आहेत. ही चौकशी उप अधीक्षक किंवा अप्पर अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करण्याचेही या आदेशात खंडपीठाने नमूद केले आहे.

हेही वाचाः गृहमंत्री अनिल देशमुखांना कोरोनाची बाधा

मंदिराचा जिर्णोद्धार करताना हरिण, गाय यांचे अंगभूत अवशेष वापरण्यात आल्याचा आणि या प्रकारात अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा भंग झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. विशेष म्हणजे कोणत्याही धार्मिक न्यासाला २० हजार रुपयांपेक्षा जास्त खर्च करायचा असेल तर धर्मादाय उपायुक्तांची परवानगी घ्यावी लागते, मात्र अशी कुठलीही परवानगी न घेताच तत्कालीन विश्वस्त मंडळाने जिर्णोध्दारावर ७५ लाख रुपये खर्च केला होता.

मोहटादेवी हे मंदिर अहमदनगर जिल्हयात असले तरी संपूर्ण मराठवाड्यातील भक्त येथे मोठ्या भक्तीभावाने येतात.विशेष म्हणजे वंजारी समाज या परिसरात असल्याने राज्यभर मोहटादेवी मंदिराचा लौकिक आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा