औरंगाबाद खंडपीठात २२ मार्चपासून पुन्हा व्हर्च्युअल सुनावणी, प्रत्यक्ष सुनावणी बंदच!

0
209
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबादेतील कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत चालला असून त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात २२ मार्चपासून पुन्हा व्हर्च्युअल सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे वकील, याचिकाकर्त, न्यायालयीन कर्मचारी यांच्यातील शारीरिक संपर्क टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे खंडपीठात आता कोणत्याही प्रकरणाची सुनावणी प्रत्यक्ष होणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा