सुभाष झांबड, सुशील बलदवासह दोन बिल्डरांना झटका, चितेगावातील प्रकल्पाची रहिवास सनद रद्द

0
263
संग्रहित छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबादेतील चार प्रसिद्ध रिअल इस्टेट आणि बांधकाम व्यावसायिकांना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी चांगलाच झटका दिला आहे. अकृषिक सनदमधील अटीची पूर्तता न केल्यामुळे चितेगावातील दोन गट क्रमांकासाठी दिलेली रहिवास प्रयोजनासाठीची सनदच रद्द करण्यात आली आहे.

सुभाष मानकचंद झांबड, सुशील बलदवा, संजीवकुमार हरकचंद कांकरिया आणि मे. रघुवीर कॅपिलट सर्व्हिसेस यांना चितेगाव येथील गट क्रमांक २३३ आणि गट क्रमांक २३४ मध्ये रहिवास प्रयोजनासाठी सनद देण्यात आली होती. मात्र त्यांच्याकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या अकृषिक सनदमधील अट क्रमांक ९ ची पूर्तताच करण्यात आली नाही.

अटीची पूर्तता न केल्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम २५८ अन्वये सुभाष झांबड, सुशील बलदवा, संजीवकुमार कांकरिया आणि मे. रघुवीर कॅपिलट सर्व्हिसेस यांना चितेगाव येथील गट क्रमांक २३३ आणि गट क्रमांक २३४ मध्ये रहिवास प्रयोजनासाठी  दिलेली सनद रद्द करून टाकली आहे. सनद रद्द करण्यात आलेले सुभाष झांबड हे एका राजकीय पक्षाचे नेते आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा