औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात ४५ उमेदवारांचे अर्ज वैध,प्रवीण घुगेंसह ८ जणांचे अर्ज अवैध

0
249
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबादः औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या ५३ उमेदवारांपैकी ४५ उमेदवाराचे अर्ज वैध ठरले असून ८ जणांचे अर्ज अवैध ठरले आहेत. अवैध अर्ज दाखल केलेल्यांमध्ये भाजपकडून उमेदवारी दाखल केलेले प्रवीण घुगे आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेले विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांचे भाऊ प्रदीप चव्हाण यांचा समावेश आहे.

वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. बोराळकर शिरीष (भारतीय जनता पाटी) औरंगाबाद, सतीश भानुदासराव चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस) औरंगाबाद, अब्दुल रऊफ (समाजवादी पार्टी) औरंगाबाद, अंकुशराव शिवाजीराव पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी) लातूर, कुणाल गौतम खरात (एमआयएम) औरंगाबाद,ढवळे सचिन राजाराम (प्रहार जनशक्ती पक्ष) औरंगाबाद, प्रा.नागोराव काशीनाथ पांचाळ (वंचित बहुजन आघाडी) परभणी, डॉ.रोहित शिवराम बोरकर (आम आदमी पार्टी) पुणे, शे.सलीम शे.इब्राहिम (वंचित समाज इन्साफ पार्टी) परभणी, सचिन अशोक निकम (रिपब्लिकन सेना) औरंगाबाद, अशोक विठ्ठल सोनवणे (अपक्ष) औरंगाबाद, ॲड.प्रा. अश्विनकुमार पुरभाजी क्षीरसागर पाटील, कोळीकर उर्फ ‘ के.सागर’ (अपक्ष) नांदेड, अक्षय नवनाथराव खेडकर (अपक्ष) औरंगाबाद, आशिष आशोक देशमुख (अपक्ष) बीड, ईश्वर आनंदराव मुंडे (अपक्ष) बीड, उत्तम बाबुराव बनसोडे (अपक्ष) नांदेड, अंभोरे शंकर भगवान (अपक्ष) औरंगाबाद, काजी तसलीम निजामोद्दीन (अपक्ष) उस्मानाबाद, कृष्णा दादाराव डोईफोडे (अपक्ष) औरंगाबाद, ॲड.गणेश नवनाथ करांडे (अपक्ष) बीड, घाडगे राणी रवींद्र (अपक्ष) बीड, जयसिंगराव गायकवाड पाटील (अपक्ष) औरंगाबाद, दिलीप हरिभाऊ घुगे (अपक्ष) हिंगोली, पोकळे रमेश शिवदास (अपक्ष) बीड, प्रवीणकुमार विष्णु पोटभरे (अपक्ष) बीड, भारत आसाराम फुलारे (अपक्ष) औरंगाबाद, ॲड. डॉ. यशवंत रामभाऊ कसबे (अपक्ष) परभणी, रमेश साहेबराव कदम (अपक्ष) नांदेड, राम गंगाराम आत्राम (अपक्ष) लातूर, वसंत संभाजी भालेराव (अपक्ष) औरंगाबाद, विजेंद्र राधाकृष्ण सुरासे (अपक्ष) जालना, विलास बन्सीधर तांगडे (अपक्ष) जालना, डॉ.विलास गोवर्धन जगदाळे (अपक्ष) औरंगाबाद, विवेकानंद शशीकांत उजळंबकर (अपक्ष) लातूर, विशाल उध्दव नांदरकर (अपक्ष) औरंगाबाद, ॲड.शरद बहिणाजी कांबळे (अपक्ष) बीड, ॲड.शहादेव जानू भंडारे (अपक्ष) बीड, ॲड.शिरिष मिलिंद कांबळे (अपक्ष) बीड, शेख गुलाम रसूल कठ्ठु (अपक्ष) औरंगाबाद, शेख हाज्जू हुसेन पटेल (अपक्ष) औरंगाबाद, समदानी चॉदसाब शेख (अपक्ष) नांदेड, सिध्देश्वर आत्माराम मुंडे (अपक्ष) बीड, संजय तायडे (अपक्ष) औरंगाबाद, संजय शहाजी गंभीरे (अपक्ष) बीड, संदीप बाबुराव कराळे (अपक्ष) नांदेड.

अवैध ठरलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. अतुल राजेंद्र कांबळे, छाया सोनवणे, सुनील महाकुंडे,  प्रविण घुगे, प्रदिप चव्हाण, विजयश्री बारगळ, बळीराम केंद्रे, शेख फेरोजमीया खालेद.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा