औरंगाबाद पदवीधर निवडणूकः पहिल्या फेरीत अशी पडली उमेदवारनिहाय मते

0
562

औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पहिल्या फेरीची उमेदवार निहाय आकडेवारी नुकतीच हाती आली आहे. निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांना २७ हजार ८५० मते मिळाली आहेत.

उमेदवारनिहाय मते अशीः

  • सतीश चव्हाणः २७ हजार ८५०
  • शिरीष बोराळकरः ११ हजार ५५८
  • रमेश पोकळेः ३हजार ५००
  • मुंडे सिद्धेश्वरः ५ हजार ५०६
  • वैध मतेः ५० हजार ६२०
  • अवैधः ५ हजार ३८१

दुसऱ्या फेरीची मतमोजणीही पूर्ण झाली असून या फेरीच्या मतमोजणीचे अधिकृत निकाल लवकरच जाहीर केले जाणार आहेत.दरम्यान, पोस्टल मतदानातही सतीश चव्हाण यांना १०७३ पोस्टल मतांपैकी ६०० पोस्टल मते पडली असून त्यांनी पोस्टल मतांत ३१४ मतांनी आघाडी घेतली आहे. प्रारंभी पोस्टल मते मोजण्यात आली आहेत. त्यापैकी सतीश चव्हाण यांना ६००, भाजपचे शिरीष बोराळकर यांना २८६ पोस्टल मते मिळाली आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा