औरंगाबाद पदवीधर निवडणूकः पहिल्या फेरी अखेर सतीश चव्हाणांची १७ हजार ३७२ मतांची आघाडी

0
1849

औरंगाबादः मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु असून पहिल्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या पहिल्या फेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण हे १७ हजार ३७२ मतांनी आघाडीवर आहेत.

पहिल्या फेरीत सतीश चव्हाण यांना पहिल्या पसंतीची २७ हजार ८७९ मते मिळाली आहेत. त्यांचे नजीकचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या पसंतीची १० हजार ९७३ मते पडली आहेत. दरम्यान पोस्टल मतदानातही सतीश चव्हाण यांना १०७३ पोस्टल मतांपैकी ६०० पोस्टल मते पडली असून त्यांनी पोस्टल मतांत ३१४ मतांनी आघाडी घेतली आहे. प्रारंभी पोस्टल मते मोजण्यात आली आहेत. त्यापैकी सतीश चव्हाण यांना ६००, भाजपचे शिरीष बोराळकर यांना २८६ पोस्टल मते मिळाली आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा