औरंगाबादेत आज सकाळी ६६ नवीन कोरोना बाधित रूग्ण, एकूण रूग्णसंख्या ९ हजार ५१० वर

0
95
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या १ हजार ५ स्वॅबपैकी ६६ रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या ९ हजार ५१० झाली आहे. आजवर आढळलेल्या रूग्णांपैकी ५ हजार ४९९ बरे होऊन घरी गेले आहेत तर  ३७० जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या  ३ हजार ६४१ जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवर केलेल्या अँटिजेन टेस्टमध्ये १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

आज सकाळी मनपा हद्दीत २१ रूग्ण आढळले. त्यात बेगमपुरा ३, एन-अकरा हडको ३,  न्याय नगर, गारखेडा १, संसार नगर १, कांचनवाडी १, छावणी १, एन बारा सिडको १, पीर बाजार उस्मानपुरा १, एन चार सिडको २, प्रथमेश नगर, बीड बायपास, देवळाई रोड १, अन्य १, चिकलठाणा १, जय भवानी नगर १, पीर बाजार १,शिव नगर १,मिल कॉर्नर १ असे रूग्ण आहेत.

ग्रामीण भागात आढळलेल्या ३१ रूग्णांमध्ये पळसवाडी, खुलताबाद ६, आयोध्या नगर, बजाज नगर ४, मोठी आळी, खुलताबाद ३, वेरूळ २, मोरे चौक, बजाज नगर २, जय भवानी चौक, बजाज नगर २, गोंडेगाव, सोयगाव २, रांजणगाव २, पोस्ट ऑफिस जवळ, गंगापूर १, अक्षदपार्क,कुंभेफळ १, करमाड १, राधाकृष्ण सोसायटी, तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर १, बीएसएनएल गोडाऊन जवळ, बजाज नगर १, इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, राम मंदिराजवळ, बजाज नगर १, शास्त्री नगर, वैजापूर १ कोरोना बाधित रूग्ण आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा