औरंगाबाद महापालिकेच्या वार्ड आरक्षण सोडतीत दिग्गजांना धक्का, महापौरांचा वार्ड महिला राखीव

  0
  452
  संग्रहित छायाचित्र.

  औरंगाबाद: आगामी महापालिका निवडणुकीसाठी सोमवारी शहरातील ११५ साठी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. यामध्ये विद्यमान महापौर उपमहापौर सभागृहनेता यांच्यासह अनेक दिग्गजांना धक्का बसला. महापौर नंदकुमार घोडेले यांचा इटखेडा वार्ड सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सुटला. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांचा शिवाजीनगर वार्ड अनुसूचित जाती महिला वर्ग प्रवर्गासाठी राखीव झाला. महिलांच्या खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला. सभापती जयश्री कुलकर्णी यांचा जवाहर कॉलनी वार्ड नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी सुटला.

  सर्वसाधारण (३० वार्ड राखीव): ६ भीमनगर-उत्तर, ९ भावसिंगपुरा-भीमनगर दक्षिण, १५ यादवनगर एन अकरा, २४ आंबेडकरनगर, ३३  कोतवालपुरा-गरमपाणी, ४६ किरडपुरा, ४८ कैसारकॉलनी, ५७ संजयनगर, ६५ सुराणानगर, ६७ कोटलाकॉलनी, ६९ क्रांतीनगर-उस्मानपुरा, ७१ रमानगर, ८० मुकुंदवाडी, ८६ राजनगर-मुकुंदनगर, ९२ बाळकृष्णनगर, ९३ गारखेडा-मेहेरनगर, ९७ एकनाथनगर, १८ मिसारवाडी, १९ आरतीनगर-मिसारवाडी, २६ मयूरनगर-सुदर्शननगर, ३६ राजाबाजार-शहागंज, ३८ टाइम्स कॉलनी-युनूस कॉलनी, ४२ आयोध्यनगर, ४५ नेहरूनगर, ६२ एन सहा सिडको, ७३ बौद्धनगर-उत्तमनगर, ८१ संजयनगर-मुकुंदवाडी, ९० पुंडलिकनगर, १०७ मयूरबन कॉलनी, १०८ प्रियदर्शनी इंदिरानगर.

  अनुसूचित जातीसाठी राखीवः प्रभाग क़मांक- ८, १२, १६, १७, २३, २९, ४०, ५०, ५२, ५८, ७०, ७७, ८४, ९६, १०१, १०५, ११०, ११२, ११३, ११४, ११५. यातील महिलांसाठी राखीव एकूण ११ प्रभागः २९ विश्वासनगर-चेलीपूरा, ५० मोतीकारंजा-भवानीनगर, १०५ सुधाकरनगर, ११२ वसंत विहार, ११३ गोपीनाथपुरम देवळाई, ११४ सातारागाव-संग़ामनगर, ५२ नागेश्वरवाडी,१६ मयूरपार्क, १७ सूरेवाडी, १२ आरेफ काँलनी,८४ कामगार काँलनी.

  अनुसूचित जमातीसाठी दोन वार्ड राखीवः ३ एकतानगर, १३ रोजेबाग-भारतमातानगर. यापैकी महिला राखीव-एकतानगर.

  ओबीसी पुरूष : ७ पडेगाव, १० नंदनवन कॉलनी, २२ चौधरी कॉलनी चिकलठाणा, ३०  लोटाकारंजा, ५१ औरंगपुरा, ५४ सिल्लेखाना, ७४ जवाहर कॉलनी, ९५ जय विश्वभारती कॉलनी, १०४ कांचनवाडी, १०९  रामकृष्णनगर, ८५ चिकलठाणा, ७६  एन-३ एन-४ पारिजातनगर, ४१ शिवनेरी कॉलनी, २७ स्वामी विवेकानंदनगर, ६६ अजबनगर-कैलासनगर.

  ओबीसी महिलासाठी राखीवः ४ चेतनानगर,५ पहाडसिंगपुरा-बेगमपुरा, ५३  समर्थनगर, १११ भारतनगर-शिवाजीनगर, ३१ जयभिमनगर,३५ औरंगपुरा-गुलमंडी, ४३-गणेशनगर, ४४-रहिमानिया काँलनी, ५५-गांधीनगर,६८-पदमपूरा, ७५-विद्यानगर,७८-ज्ञानेश्वरनगर, ९१-न्यायनगर,३४-खडकेश्वर,४९-नवाबपूरा,११२-राहूलनगर.

  प्रतिक्रिया द्या

  कृपया आपली टिप्पणी द्या!
  कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा