डाक विभागात नेमणार विमा एजंट, ‘या’ तारखेला होणार थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती

1
277
प्रातिनिधिक छायाचित्र.

औरंगाबाद: औरंगाबाद डाक विभागात डाक जीवन विमा, ग्रामीण विमा एजंट थेट मुलाखतीव्दारे नेमण्यात येणार आहेत. इच्छुकांनी विहित नमुन्यातील अर्जासह १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. नियुक्ती ही लायसन्स तसेच कमिशन तत्वावर असेल, असे औरंगाबाद डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक यांनी कळविले आहे.

विमा एजंटसाठी १८ ते ५० वर्षे अशी वयोमर्यादा आहे. अर्जदार हा किमान १० वी उत्तीर्ण अथवा केंद्र, राज्य सरकार मान्यताप्राप्त समकक्ष परीक्षा उत्तीर्ण श्रेणी असावा. सुशिक्षित बेरोजगार, निवृत्त शिक्षक, माजी सैनिक, अंगणवाडी सेविका, महिला बचत गट, माजी जीवन विमा सल्लागार, इतर विमा कंपन्याचे माजी अभिकर्ते स्वयंरोजगार वा पात्रता असलेले इच्छुकांसाठी पात्रता निकष आहेत.

हेही वाचाः  चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

उमेदवाराची  निवड थेट मुलाखतीव्दारे करण्यता येणार आहे.व्यावसायिक कौशल्य, व्यक्तिमत्व, जीवन विम्या बाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान तसेच स्थानिक परिसराची माहिती इत्यादी बाबी आवश्यक  आहेत. निवड झालेल्या उमेदवारास ५ हजार रुपयांची अनामत रक्कम सुरक्षा ठेव म्हणून ठेवणे बंधनकारक आहे. जे की राष्ट्रीय बचत पत्र, किसान विकास पत्र स्वरुपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल, जो आयआरडीएची परवाना परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवान्यामध्ये रुपांतरित केला जाईल, असेही सांगितले आहे.

इच्छुकांनी प्रवर अधीक्षक, डाकघर, औरंगाबाद विभाग, जुना बाजार, औरंगाबाद-४३१००१ यांचे कार्यालयात जन्म तारीख व शैक्षणिक पात्रतेच्या पुराव्यासाठी लागणारी मूळ कागदपत्रे, त्या कागदपत्रांची एक साक्षांकीत प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड व दोन पासपोर्ट आकाराच्या छायाचित्र तसेच विहित नमुन्यातील अर्जासह १६ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. नियुक्ती ही लायसन्स तसेच कमिशन तत्वावर असेल, असे औरंगाबाद डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक यांनी कळविले आहे.

एक प्रतिक्रिया

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा