अयोध्येतील वादग्रस्त जागा रामलल्लाची, मशीद बांधण्यासाठी वक्फ बोर्डाला 5 एकर जागा द्या : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक फैसला

0
135

नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या वादग्रस्त राम जन्मभूमी- बाबरी मशीद प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक फैसला सुनावला. अयोध्येतील वादग्रस्त 2.77 जागा रामलल्लाचीच असून सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येत मशीद बांधण्यासाठी मोक्याच्या ठिकाणी 5 एकर जागा देण्यात यावी, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत.

सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांच्या पाच सदस्यीय घटनापीठाने हा ऐतिहासिक फैसला दिला. केंद्र सरकारने वादग्रस्त ठिकाणी मंदिर बांधण्यासाठी तीन महिन्यांत विश्वस्त मंडळाची स्थापना करावे आणि ही वादग्रस्त जागा विश्वस्त मंडळाकडे सोपवावी, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त जागेचे केलेले त्रिभाजन चुकीचे होते, असे निरीक्षणही सर्वोच्च न्यायालयाने नोंदवले आहे. दरम्यान, सुन्नी वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा