उद्या बी.रघुनाथ ऑनलाइन युवा काव्यसंध्या, लोकप्रिय तरुणाई सादर करणार काव्याविष्कार!

0
54

औरंगाबाद: मराठवाड्याचे भूषण व ज्येष्ठ कवी दिवंगत बी.रघुनाथ यांच्या स्मृतिदिनानिमित्त यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,मुंबईचे औरंगाबाद विभागीय केंद्र व नाथ ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने  मंगळवार, दिनांक ७ सप्टेंबर रोजी बी.रघुनाथ युवा काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाच्या निर्बंधांमुळे ही काव्य मैफल यंदा ऑनलाइन स्वरूपात आयोजित करण्यात आली आहे. मंगळवार दि. ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या www.facebook.com/ycp100 या फेसबुक पेजवरून ही मैफल रसिकांना ऐकता येईल.

नाथ ग्रुपचे अध्यक्ष व बी. रघुनाथ काव्यसंध्याचे आयोजक नंदकिशोर कागलीवाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे. राज्यभर आपल्या कवितांनी गाजत असलेले युवा कवी व कवयित्री यांचा सहभाग यंदाच्या काव्यसंध्येचे आकर्षण असणार आहे.

हेही वाचाः चला उद्योजक बनाः स्फूर्ती योजना देते पारंपरिक उद्योगांना ५ कोटींपर्यंतचा निधी, जाणून घ्या तपशील

नांदेड येथील सुहासिनी देशमुख, मुंबई येथील भैरवी चितळे, अकोला येथील कवी अनंत राऊत, सोलापूर येथील नितीन जाधव, बीड येथील संतोष गायकवाड व औरंगाबाद येथील अपूर्व राजपूत हे कवी आपल्या कविता या मैफलीत सादर करतील. औरंगाबाद येथील कवी डॉ.स्वप्निल चौधरी हे या मैफलीचे निवेदन करणार आहेत.

दरवर्षीप्रमाणेच रसिकांनी या मैफलीला ऑनलाइन स्वरूपात मोठा प्रतिसाद द्यावा, असे आवाहन विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, कोषाध्यक्ष सचिन मुळे, सचिव नीलेश राऊत, सदस्य डॉ.भालचंद्र कांगो, प्रा.अजित दळवी, डॉ.श्रीरंग देशपांडे, डॉ.अपर्णा कक्कड, दासू वैद्य, डॉ.मुस्तजीब खान, डॉ.रेखा शेळके, विजय कान्हेकर, सुहास तेंडुलकर, सुनील किर्दक, रेणुका कड, सुबोध जाधव आदींनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा