तीन लिंग असलेले बाळ जन्मले, ट्रिपहेलियाच्या प्रकारामुळे डॉक्टरही हैराण!

0
893
प्रातिनिधिक छायाचित्र.

बगदादः मानवी वैद्यकीय इतिहासातील दुर्मिळातील दुर्मिळ घटना इराकमध्ये घडली असून तीन गुप्तांग म्हणजेच शिश्न असलेल्या एका बाळाचा जन्म झाला आहे. इराकच्या मोसूल शहरातील दुहोकमध्ये जन्मलेल्या या बाळाला तीन शिश्न असून वैद्यकीय भाषेत त्याला ट्रिपहेलिया म्हणतात. या बाळाच्या जन्मानंतर त्याला तीन शिश्न असल्याचे त्याच्या कुटुंबीयाना कळाले. त्यामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत. ट्रिपहेलियाची ही इराकमधील पहिलीच घटना आहे.

इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरीमध्ये ट्रिपहेलियासह जन्मलेल्या या बाळाबाबत माहिती देण्यात आली आहे. तीन शिश्न अशलेला अथवा ट्रिपहेलियाचा हा पहिलाच प्रकार आहे. या बाळाच्या कुटुंबीयांमध्ये कोणताही अनुवांशिकपणा नाही. बाळ गर्भात असताना औषधांचा योग्य परिणाम न झाल्यामुळे त्याला तीन शिश्न आली असावीत अशी शक्यता आहे, असे डॉ. शाकीर सलीम जबाली यांनी सांगितले.

जन्मल्यानंतर हे बाळ तीन महिन्यांचे झाले, त्यावेळी त्याच्या अंडकोषामध्ये सूज आल्याची तक्रार घेऊन त्याचे पालक डॉक्टरांकडे गेले होते. बाळाची वैद्यकीय तपासणी केल्यनंतर त्याला तीन शिश्न असल्याचे निदर्शनास आले. मुख्य शिश्नाच्या मुळाशी आणखी एक शिश्न होते. त्याची लांबी दोन सेंटीमीटर इतकी होती तर दुसऱ्या शिश्नाची लांबी एक सेंटीमीटर होती.

या बाळाला असलेल्या तीन शिश्नांपैकी फक्त एकच शिश्न कार्यरत होते. अन्य दोन शिश्नांमध्ये मूत्रमार्ग अथवा मलमूत्र नलिका नव्हती. त्यामुळे दोन शिश्नांतून शरीराबाहेर मूत्र बाहेर पडण्याची प्रक्रिया होणार नव्हती. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी या बाळाला असलेले दोन अतिरिक्त शिश्न शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. न्यूयॉर्क टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून या बाळाचे दोन अतिरिक्त लिंग काढून टाकले. त्यानंतर त्या बाळाचा जवळपास एक वर्ष फॉलोअप घेतला. आता त्या बाळाला कोणतीही समस्या नाही. भारतातही २०१५ मध्ये दोन लिंग असलेल्या बाळाचा जन्म झाला होता. मात्र त्याबाबतची वैद्यकीय माहिती कोणत्याही वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आली नव्हती. इराकमधील तीन लिंगासह म्हणजे ट्रिपहेलियाच्या या प्रकारामुळे डॉक्टरही हैराण झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा