यंदाच्या नवरात्रोत्सवात गरबा, दांडियावर बंदी!

0
73
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे यंदाचा नवरात्रोत्सव साधेपणानेच साजरा केला जाणार असून यंदा गरबा आणि दांडियावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या गृह विभागाने याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आज जारी केल्या आहेत.

१७ ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. गरबा आणि दांडिया हे या नवरात्रोत्सवाचे खास वैशिष्ट्ये आहे. मात्र राज्यातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन यंदा गरबा, दांडियावर बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे यंदाचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा आणि दसराही साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांना स्थानिक महानगरपालिका, स्थानिक प्रशासनाच्या धोरणानुसार पूर्वपरवानगी बंधनकारक असणार आहे. मंडप मर्यादित स्वरुपताच उभारण्यात यावा. घरगुती किंवा सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट साधेपणानेच करावी, गरबा, दांडिया किंवा अन्य सांस्कृतिक कार्यकर्म आयोजित करू नये, असे या मार्गदर्शक सूचनांत म्हटले आहे.

मूर्तीच्या उंचीवरही निर्बंधः सार्वजनिक मूर्ती ४ फुटांची, घरगुती दोनचः या नवरात्रोत्सवात देवीच्या मूर्तीच्या उंचीवरही निर्बंध घालण्यात आले असून सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या देवीची मूर्ती ४ फूटांची तर घरगुती देवीची मूर्ती दोनच फूट उंचीची असावी, पारंपरिक मूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तींचे पूजन करावे, मूर्ती शाडू मातीची किंवा पर्यावरणपूरक असेल तर तिचे विसर्जन घरातच करावे आणि घरी विसर्जन शक्य नसेल तर कृत्रिमस्थळी विसर्जन करावे, असे या मार्गदर्शक सूचनांत म्हटले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा