गुड न्यूजः बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्ती वेतनात होणार शेवटच्या वेतनाच्या ३० टक्के वाढ!

0
158

मुंबईः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्ती वेतनात कर्मचाऱ्यांच्या अखेरच्या वेतनाच्या ३० टक्के रक्कम कौटुंबिक निवृत्तीवेतन म्हणून देय असेल. या निर्णयामुळे कुटुंब निवृत्तीवेतन प्रतिकुटुंब/ ३० हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत वाढू शकेल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईः सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंब निवृत्तीवेतनात कर्मचाऱ्यांच्या अखेरच्या वेतनाच्या ३० टक्के रक्कम कौटुंबिक निवृत्तीवेतन म्हणून देय असेल. या निर्णयामुळे कुटुंब निवृत्तीवेतन प्रतिकुटुंब/ ३० हजार ते ३५ हजार रुपयांपर्यंत वाढू शकेल, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेसाठी द्विपक्षीय तोडग्याविषयी सुरु असलेल्या बैठकसत्रातील ११ वी बैठक ११ नोव्हेंबर २०२० रोजी झाली होती.  त्या बैठकीत भारतीय बँक संघटना आणि इतर संघटनांनी स्वाक्षरी केली होती. त्याच बैठकीत एनपीएस अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कुटुंब  निवृत्तीवेतनात वाढ करण्याचा आणि यातील बँकांकडून भरल्या योगदानातही वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, अशी माहिती आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव देवाशीष पांडा यांनी दिली. अर्थमंत्र्यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, असे त्यांनी सांगितले.

आधी या योजनेअंतर्गत, कर्मचाऱ्याच्या अखेरच्या वेतनाच्या १५ टक्के, २० टक्के आणि ३० टक्के असे स्तर करण्यात आले होते. त्यानुसार वेतनाच्या विशिष्ट प्रमाणात निवृत्तीवेतन कर्मचाऱ्याला मिळत असे. निवृत्तीवेतनाची कमाल मर्यादा ९ हजार २८४ रुपये इतकी होती आणि त्यापुढे संबंधित टक्क्यांनुसार निवृत्तीवेतन निश्चित केले जात असे. ही रक्कम अत्यंत तुटपुंजी होती आणि या रकमेत सुधारणा व्हावी, अशी बँक कर्मचाऱ्यांची मागणी होती.  या निर्णयामुळे बँक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना चांगले जीवनमान जगण्यासाठी एक चांगले निवृत्तीवेतन मिळू शकेल.

एनपीएस अंतर्गत,कर्मचाऱ्यांच्या खात्यात बँकेकडून जमा केल्या जाणाऱ्या योगदानाच्या रकमेतही १० टक्क्यांवरुन १४ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे.

या वाढीव कुटुंब निवृत्तीवेतनामुळे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या हजारो कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना लाभ मिळणार आहे. नव्या पेन्शन योजनेत बँकांचे योगदानही वाढवल्याने या सर्व कुटुंबांना आर्थिक सुरक्षितताही मिळाली आहे,  असे आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव देवाशीष पांडा यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा