आयपीएलचा १४ वा हंगाम स्थगीत, कोरोनाच्या तडाख्यामुळे बीसीसीआयचा निर्णय

0
256
संग्रहित छायाचित्र.

मुंबईः आयपीएलचा चौदावा हंगाम स्थगीत करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने आज, मंगळवारी घेतला.

 बायोबबलमध्ये असतानाही आयपीएलमधील कोलकाता संघाच्या दोन खेळाडूंना सोमवारी कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे बंगळुरूसोबत होणारा सामना रद्द करावा लागला होता. दरम्यान चेन्नईच्याही तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली. आज मंगळवारी हैदराबादचा वृद्धीमान साहा यालाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे चेन्नई आणि राजस्थानमध्ये उद्या बुधवारी होणारी लढत रद्द करण्याचा निर्णय आज सकाळी घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएल स्पर्धा स्थगीत करण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे.

 कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सर्व सामने मुंबईमध्ये खेळवण्यावर बीसीआय विचार करत असल्याचेही वृत्त समोर आले होते. बीसीसीआयच्या या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. आयपीएलचे सामने रद्द करावे किंवा पुढे ढकलावेत, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

कोरोना संकटाच्या काळात आयपीएल स्पर्धा इतकी महत्वाची नसून आयपीएलच्या खेळाडूंसाठी होत असलेला संसाधनांचा वापर कोरोना रुग्णांसाठी केला जाऊ शकतो, असे या याचिकेत म्हटले आहे. या याचिकेवर गुरूवारी सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र या सुनावणी आधीच आयपीएलच्या स्पर्धा स्थगीत करण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा